For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासदार दानिश अलींची बसपमधून हकालपट्टी

06:34 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
खासदार दानिश अलींची बसपमधून हकालपट्टी
Advertisement

पक्षविरोधी कारवायांचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

बहुजन समाज पक्षाने खासदार दानिश अली यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा यांनी अमरोहा लोकसभा खासदार दानिश अली यांना पत्र लिहून त्यांची हकालपट्टी झाल्याची माहिती दिली आहे.

Advertisement

बसपा सुप्रिमो मायावती यांनी खासदार दानिश अली यांच्यावर कारवाई करताना त्याबाबतचे स्पष्टीकरणही दिले आहे. अली यांना यापूर्वी अनेकवेळा पक्षाची धोरणे, विचारधारा आणि शिस्तीच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करू नका, असे तोंडी सांगितले होते. परंतु असे असतानाही त्यांनी सातत्याने पक्षाविरोधात अशा गोष्टी केल्याने कारवाई केल्याचे सांगितले. 2018 मध्ये दानिश अली कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी देवेगौडा यांच्या जनता पक्षाचे सदस्य म्हणून काम करत होते. 2018 च्या कर्नाटक सार्वत्रिक निवडणुकीत, बहुजन समाज पक्ष आणि जनता पक्षाने युती करून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत देवेगौडांच्या पक्षातर्फे दानिश अली खूप सक्रिय होते. त्यावेळी कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर एचडी देवेगौडा यांच्या विनंतीवरून दानिश अली यांना अमरोहामधून बसपाचे उमेदवार बनवण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.