कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्यांचा पर्दाफाश

12:40 PM Jan 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हणूजण पोलिसांकडून चौघा बिगरगोमंतकीयांना अटक : तिघेजण हैदराबादहून, तर एकटा ग्वाल्हेरहून जेरबंद

Advertisement

पणजी : गोव्यात अस्तित्वातच नसलेल्या व्हिला आणि इतर मालमत्ता विक्रीस उपलब्ध असल्याच्या जाहिराती देऊन त्या खरेदी करायच्या असल्यास आगाऊ रकमेच्या नावाखाली तब्बल 500 जणांना कोट्यावधी रुपयांना गंडविणाऱ्या गोव्याबाहेरच्या टोळीचा हणजूण पोलिसांना पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चारजणांना अटक केली असून यातील तिघांना हैदराबाद येथून तर एकट्याला ग्वाल्हेर येथून अटक करण्यात आल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली आहे. साल 2022 पासून हा फसवणुकीचा प्रकार सुऊ होता. काल सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अक्षत कौशल बोलत होते. त्यांच्या सोबत मयंक दुबे (आयपीएस अधिकारी) व अऊण बालगोत्र  (आयपीएस अधिकारी) उपस्थित होते. अटक केलेल्या संशयितांमध्ये सौरभ दुसेजा (ग्वाल्हेर), सय्यद अली मुख्तार (हैदराबाद), मोहम्मद फिरोज (हैदराबाद) आणि मोहम्मद अझऊद्दीन सैफ (हैदराबाद) यांचा समावेश आहे. चौकशीत त्यांनी गुह्याची कबुली दिली आहे. त्याबरोबर  या फसवणूक प्रकाराची कार्यपद्धतीही स्वत:च उघड केली आहे. विविध बँकांतील त्यांची 15 खाती गोठवण्यात आली आहेत.

Advertisement

भाड्याच्या खोलीतून कारभार

फसवणुकीचा सारा प्रकार हैदराबादमधील भाड्याच्या खोलीतून चालत होता. काहीजणांचे वेबसाईटद्वारे फोन नंबर मिळवून त्यांना कॉल केले जायचे. त्यांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी महिला टेलिफोन ऑपरेटर्सचा वापर केला जात होता. गोव्यात नसलेल्या मालमत्तेचा किंवा व्हिलाचे फोटा ऑनलाईन दाखविले जायचे आणि त्यांना लवकरात लवकर बुकिंग करण्यासाठी प्रवृत्त केले जायचे.

प्रत्यक्षात मालमत्ता नाहीच 

एखाद्याने बुकिंग करण्याची तयारी दर्शवली की त्याच्याकडे आगावू रक्कमेची मागणी केली जायची. हा सगळा व्यवहार ऑनलाईन होत होता. आगावू रक्कम भरलेली व्यक्ती जेव्हा आपण आरक्षित केलेला व्हिला किंवा मालमत्ता पहायला गोव्यात येत असे, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात येत होते.

पोलिसांकडे आल्या अनेक तक्रारी 

अशा प्रकारे ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक तक्रारी गोवा पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. ज्या लोकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे, त्यांच्याशी  संपर्क साधण्याचा आणि त्यांच्या तक्रारी नोंदवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे कौशल यांनी पुढे सांगितले. याप्रकरणी आयपीएस अधिकारी मयंक दुबे व अऊण बालगोत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हणजुण पोलिसस्थानकाचे पोलिस निरीक्षक सुरज गावस, उपनिरीक्षक संहिल वारंग, रमेश हरिजन तसेच कळंगुट पोलिसस्थानकाचे कॉन्स्टेबल राज परब यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान अशाच प्रकारे अनेकांना लुबाडण्यात आल्याच्या तक्रारी गोवा पोलिसांकडे आल्या आहेत. या विषयी अधिक खोलवर तपास केला असता तब्बल 500 पर्यटक या घोटाळ्याला बळी पडले असल्याचेही समजले. या सर्वांशी संपर्क साधून त्यांच्या तक्रारी नोंदवण्याचे काम सुरू आहे. हा प्रकार 2022 पासून सुरू आहे. हे प्रकरण नेमके किती खोलवर गेले आहे याचाही तपास सुरू आहे, असे कौशल म्हणले.

अशी केली जायची ऑनलाईन फसवणूक...

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article