देशाची निर्यात वाढली
आयातही वधारली : सरकारी आकडेवारीमधून माहिती
नवी दिल्ली : देशाची निर्यात सप्टेंबरमध्ये 34.58 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली, आयातीतही वाढ झाली आहे. भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात सप्टेंबरमध्ये किरकोळ वाढून 34.58 अब्ज डॉलरची झाली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 34.41 अब्ज डॉलरवर राहिली होती. बुधवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2023 मधील 54.49 अब्ज डॉलरवरून सप्टेंबरमध्ये आयात 1.6 टक्क्यांनी वाढून 55.36 अब्ज डॉलरवर राहिली आहे. समीक्षाधीन महिन्यात व्यापार तूट (आयात आणि निर्यातीमधील अंतर) 20.78 अब्ज डॉलरची होती. भारताच्या व्यापारी मालाची निर्यात ऑगस्टमध्ये वार्षिक आधारावर 9.3 टक्क्यांनी घसरली आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) निर्यात एक टक्क्याने वाढून 213.22 अब्ज डॉलरची झाली आहे, तर आयात 6.16 टक्क्यांनी वाढून 350.66 अब्ज डॉलरची झाली आहे.