For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

फेब्रुवारी महिन्यात 41 अब्ज डॉलर्सची निर्यात

06:31 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
फेब्रुवारी महिन्यात 41 अब्ज डॉलर्सची निर्यात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

फेब्रुवारी महिन्यात 41.4 अब्ज डॉलर्सची वस्तुंची निर्यात भारताने केली असल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने नुकतीच दिली आहे. फेब्रुवारीमध्ये निर्यातीमध्ये 11 टक्के वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

चालू आर्थिक वर्षातील 11 महिन्यांमध्ये सर्वाधिक वाढ मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये दिसून आली आहे. भारताची व्यापारी तूट फेब्रुवारीमध्ये 18.71 अब्ज डॉलर्सवर म्हणजेच 1.55 लाख कोटी रुपयांवर राहिली होती. जानेवारी महिन्यामध्ये हीच व्यापारी तूट 1.45 लाख कोटी रुपये इतकी होती. फेब्रुवारी महिन्यात भारताने 3.43 लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात केली आहे. दुसरीकडे आयातीमध्येसुद्धा वाढ दर्शवली गेली आहे. 12 टक्के वाढीसह 4.98 लाख कोटी रुपयांची आयात भारताने फेब्रुवारीत केली आहे. 2022-23 आर्थिक वर्षामध्ये भारताने 37.38 लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात केली होती. यामध्ये सेवानिर्यात 26.96 कोटी रुपयांची झाली होती. एकंदर निर्यातीचा आकडा पाहता 64.34 लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये निर्यातीमध्ये 14 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

Advertisement

व्यापारी तूट म्हणजे काय ?

Advertisement

जेव्हा एका निश्चित कालावधीसाठी देशाची आयात निर्यातीच्या तुलनेमध्ये जास्त होते. तेव्हा ती व्यापारी तूट म्हणून म्हटली जाते. याचाच अर्थ जेव्हा देश विक्रीच्या तुलनेमध्ये खरेदी अधिक करतो, तेव्हा ट्रेड डेफिसिट किंवा व्यापारी तूट होत असते.

Advertisement
Tags :
×

.