For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2 लाख कोटींच्या आयफोन्सची निर्यात

06:30 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
2 लाख कोटींच्या आयफोन्सची निर्यात
Advertisement

त. भा. वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

आर्थिक वर्ष 2026 मध्ये 2 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आयफोन्सची निर्यात भारतातून करण्यात आली आहे. ही निर्यात विक्रमी स्वरुपातील आहे. पीएलआय योजनेचा लाभ उठवत इलेक्ट्रॉनिक्स निर्मात्या कंपन्यांनी मोबाईल निर्मितीमध्ये क्रांती केली आहे.

आयफोन बनविणाऱ्या अॅपल कंपनीने वरील निर्यातीबाबतची माहिती शुक्रवारी सरकारला दिली आहे. इतर सर्व देशांपेक्षा भारतातून होणारी आयफोन्सची निर्यात सर्वाधिक राहिली आहे. पूर्ण आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताची एकूण स्मार्ट फोन निर्यात जवळपास 2.6 लाख कोटी रुपयांची राहिली आहे. यामध्ये एकट्या आयफोनचे योगदान 75 टक्के इतके आहे. या दरम्यान जवळपास दोन लाख कोटी रुपये मुल्याच्या आयफोनची निर्यात केली गेली आहे.

Advertisement

निर्यात शुन्यावरुन 1 लाख कोटीपार

सरकारच्या मेक इन इंडिया या मोहिमेमध्ये अॅपल कंपनीने पीएलआय सवलतीच्या मदतीने आयफोनवर व स्मार्ट फोन उत्पादनामध्ये सर्वात वेगवान गती घेतली. यामुळेच निर्यातीमध्ये भारताचे नाव ठळकपणे समोर आले. पीएलआय योजना सुरु झाल्यानंतर एकेकाळी अॅपलची आयफोनची निर्यात भारताची 0 टक्के इतकी होती. जी गेल्या पाच वर्षामध्ये दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करु शकली आहे. 2021-22 मध्ये अॅपलने 9351 कोटी रुपये मुल्यांचे आयफोन पाठविले होते. 2022-23 मध्ये 44269 कोटी रुपये मुल्याचे आयफोन निर्यात केले गेले.

पीएलआय योजनेने ज्या पद्धतीने गती घेतली. त्यानंतर 2023-24 मध्ये आयफोनच्या निर्यात मुल्यांनी 85 हजार कोटींचा टप्पा पार केला. आणि 2024-25 आर्थिक वर्षात 1 लाख कोटी रुपये मुल्याच्या आयफोनची निर्यात करण्यामध्ये भारताला यश आले.

Advertisement
Tags :

.