महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मार्चपर्यंत ‘ब्राह्मोस’ची निर्यात सुरू होणार

07:00 AM Jan 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात पूर्णपणे आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या प्रयत्नाला आणखी एक यश मिळणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) मार्चपर्यंत ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची निर्यात सुरू करणार आहे. डीआरडीओ प्रमुख समीर कामत यांनी स्वत:च याची पुष्टी दिली आहे. डीआरडीओ पुढील 10 दिवसांमध्येच या क्षेपणास्त्रांच्या ग्राउंड सिस्टीमची निर्यात सुरू करणार आहे. डीआरडीओने 307 एटीएटीजीएस गन विकसित केली असून त्यांची निर्मिती भारत फोर्ज आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम यासारख्या खासगी क्षेत्रातील कंपन्या करत आहे, त्यांच्यासाठी या चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत विदेशातून ऑर्डर मिळू शकते असे त्यांनी सांगितले आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी फिलिपाईन्ससोबत अन्य देशांनीही रुची दाखविली आहे. निर्यातीसाठी तयार एटीएजीएसच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. 31 मार्चपूर्वी याकरता ऑर्डर प्राप्त होणार असल्याचा अनुमान आहे. डीआरडीओकडून आतापर्यंत ज्या शस्त्रास्त्रांचे उत्पादन होतेय, त्यांना लवकरच सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये सामील करण्यात येईल. एलसीए एमके-1ए, अर्जुन एमके-1ए, क्यूआरएसएएम सोबतच आणखी काही क्षेपणास्त्रs लवकरच सैन्याचा हिस्सा ठरणार असल्याची माहिती कामत यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article