डेन्मार्कमध्ये इस्रायलच्या दूतावासाबाहेर स्फोट
स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू
वृत्तसंस्था/ कोपेनहेगन
डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनमध्ये इस्रायलच्या दूतावासानजीक स्फोट झाले आहेत. दूतावासाच्या आसपास बुधवारी दोन स्फोट झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी या स्फोटांप्रकरणी तपास सुरु केला आहे. या स्फोटांमध्ये कुणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू असल्याचे डेन्मार्क पोलिसांकडून सांगण्यात आले.
इस्रायलच्या दूतावासानजकी स्फोट झाल्याने सर्व पैलू विचारात घेत तपास केला जात आहे. सध्या स्फोटांमधील कारण जाणून घेण्याचे अणि स्फोटासाठी जबाबदार लोकांची ओळख पटविण्याचे काम केले जात आहे. याकरता पोलिसांची तीन पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
इस्रायल अन् इराण यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे असताना डेन्मार्कमध्ये हे स्फोट झाले आहेत. डेन्मार्कमधील या स्फोटामागे इराणशी संबंधित घटकांचा हात असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. स्फोटांबद्दल आताच काही सांगणे घाईचे ठरणार आहे. तपासानंतरच स्थिती स्पष्ट होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.