For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

रेल्वेमार्गावरील स्फोटाने राजस्थानमध्ये खळबळ

06:47 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेमार्गावरील स्फोटाने राजस्थानमध्ये खळबळ
Advertisement

एटीएस, आयबीकडून तपास : 8 गाड्या रद्द - स्फोटाचा आवाज 200 मीटरपर्यंत

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीगंगानगर

राजस्थानच्या श्रीगंगानगर जिह्यातील अनुपगड-सुरतगड रेल्वेमार्गावर मंगळवारी रात्री उशिरा एक शक्तिशाली स्फोट झाला. अनुपगड शहराजवळील परिसरात झालेल्या या स्फोटामुळे रेल्वे रुळांचे नुकसान झाले. रुळाखालील दोन सिमेंट स्लीपर पूर्णपणे फुटल्यामुळे रुळांच्या मध्ये सुमारे दोन फूट खोल ख•ा पडला. स्फोटाचा आवाज सुमारे 200 मीटर अंतरापर्यंत ऐकू आला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस, आयबी, सीआयडी आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आदी यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

Advertisement

बॉम्बस्फोटाची ही घटना मंगळवारी रात्री सुमारे 10:35 वाजता घडली. याच भागातून सुमारे 45 मिनिटांपूर्वी एक पॅसेंजर ट्रेन गेली होती. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील गाड्या बुधवार सकाळी 9 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच घटनास्थळी तपास आणि सुरक्षा उपाययोजना तातडीने सुरू करण्यात आल्या.

रेल्वे गेल्यानंतर सुमारे 45 मिनिटांनी स्फोट

रामसिंगपूरचे पोलीस अधीक्षक राम प्रताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे 8:30 वाजता अनुपगड जंक्शनवरून सुरतगडसाठी एक प्रवासी रेल्वे निघाली. ही ट्रेन रात्री सुमारे 9 वाजता 50 जीबी गावाजवळून गेली. त्यानंतर सुमारे 45 मिनिटांनी रेल्वे रुळावर स्फोट झाला. आवाज ऐकून, सुमारे 200 मीटर अंतरावर राहणाऱ्या गावातील लोकांनी रुळांकडे धाव घेतली. त्यानंतर घटनेसंबंधी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस आणि इतर अधिकारी रात्री सुमारे 11 वाजता घटनास्थळी पोहोचले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की रेल्वे रुळाखालील दोन सिमेंट स्लीपर तुटले. रुळ आणि स्लीपर यांना जोडणारे लॉकदेखील खराब झाले. रुळावर सुमारे दोन फूट खोल ख•ा पडला. रेल्वेचे पथक पहाटे 2 वाजता घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी जवळच्या लोकांची चौकशी करून तपास सुरू केला.

Advertisement
Tags :

.