For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्यानमारमध्ये बंडखोरांच्या नियंत्रणातील क्षेत्रात स्फोट, 46 ठार

06:04 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
म्यानमारमध्ये बंडखोरांच्या नियंत्रणातील क्षेत्रात स्फोट  46 ठार
Advertisement

300 हून अधिक घरांचे नुकसान

Advertisement

वृत्तसंस्था/ यंगून

म्यानमारच्या शान प्रांतात बंडखोर संघटना ताआंग नॅशनल लिबरेशन आर्मीच्या (टीएनएलए) नियंत्रणाखालील भागात भीषण स्फोट झाला असून यात कमीतकमी 46 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 मुलांचा समावेश आहे. ही घटना नामखाम टाउनशिपच्या काउंग टाट गावात घडली असून ते चीन सीमेनजीक आहे.

Advertisement

स्फोट अत्यंत शक्तिशाली असल्यामुळे गावातील सुमारे 300 घरांचे नुकसान झाले आहे. अनेक परिवारांची घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.  तर या स्फोटातील अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते अशी भीती व्यक्त होत आहे. खाणींमध्ये वापरण्यात येणाऱ्या विस्फोटक पदार्थांमुळे हा विस्फोट झाल्याचा दावा टीएनएलएने केला आहे. टीएनएलए म्यानमारमधील सर्वात शक्तिशाली वांशिक बंडखोर संघटनांपैकी एक आहे. अनेक बंडखोर समूह खनिज खननातून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे स्वत:चे अभियान चालवत आहेत.

Advertisement
Tags :

.