जपानमधील अमेरिकेच्या तळावर स्फोट
वृत्तसंस्था / टोकियो
जपानच्या शोकिनावा द्वीपसमूहात असलेल्या अमेरिकेच्या सेनातळावर मोठा बाँबस्फोट झाला आहे. या स्फोटात जपानच्या चार भूसैनिकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी घडली. घायाळ सैनिकांच्या बोटांना जखमा झाल्या आहेत. हे सैनिक न फुटलेले बाँब साठविले जातात, त्या स्थानी काम करत होते, अशी माहिती देण्यात आली. अमेरिकेचा हा तळ कडेना या नावाने ओळखला जातो.
हा स्फोट का आणि कसा झाला, याचा शोध घेण्यात येत आहे. हा दहशतवादी हल्ला नसल्याचे प्रथर्मदर्शनी स्पष्ट झाले असले तरी, सर्व शक्यता गृहित धरल्या गेल्या आहेत. जपानमधील काही अतिरेकी गटांचा हात या स्फोटामध्ये आहे काय, याचाही शोध घेतला जात आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानवर मोठ्या प्रमाणात बाँब वर्षाव करण्यात आला होता. या वर्षावात न फुटलेले अनेक बाँब नंतर सापडले. त्या सर्व न फुटलेल्या बाँबस्चा साठा या तळावर करण्यात आला होता. अशा साठविलेल्या बाँबस्चा हा स्फोट असावा, असाही तर्क करण्यात आला आहे.