सीएनजी पंपावर स्फोट; दिल्लीत तिघांचा मृत्यू
06:22 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
दिल्लीतील टिकरी कलान परिसरात सीएनजी पंपावर बुधवारी दुपारच्या सुमारास स्फोट झाला. गॅसने भरलेल्या ट्रकचा स्फोट होऊन आग लागली. पंपात सीएनजी भरत असताना हा स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पंपावर सीएनजी भरणाऱ्या व्यक्तीचाही स्फोटात मृत्यू झाला. दुपारी 3:46 वाजता अग्निशमन दलाला स्फोटाची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. डीसीपींच्या माहितीनुसार, स्फोटात सुरुवातीला पाच जण गंभीर जखमी झाले होते. या जखमींपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Advertisement
Advertisement