दुबईत कार शोरुममध्ये विस्फोट, केरळच्या युवकाचा मृत्यू
दुबई : दुबई येथील कार शोरूममध्ये गॅस सिलिंडर विस्फोटात केरळच्या एका युवकाचा मृत्यू झाला आहे. केरळच्या कोल्लम जिल्ह्याचा रहिवासी 27 वर्षीय शिजिंन पॉल याचा शेख जायद रोड येथील एका कार शोरूमध्ये झालेल्या विस्फोटात मृत्यू झाला आहे. ही घटना आखाती देशांमध्ये भारतीय कामगारांच्या सुरक्षेवरुन वाढत्या चिंतेदरम्यान घडली आहे. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार 2023-25 दरम्यान कार्यस्थळावरील दुर्घटनांमध्ये जवळपास दर आठवड्याला तीन भारतीयांना जीव गमवावा लागला आहे. दुबईतील शोरूममध्ये झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले आहेत. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने पॉलच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. तसेच त्याचे पार्थिव मायदेशी नेण्याची प्रक्रिया सुविधाजनक करण्यासाठी त्याचा परिवार व स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे दूतावासाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित कार शोरूममध्ये पॉल हा मीडिया मॅनेजर म्हणून काम करत होता. आग लागल्याचे समजताच कर्मचारी बाहेरच्या दिशेने पळाले व सिलिंडरचा विस्फोट होण्यापूर्वी काही लोकांनी अग्निशमन यंत्रांद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला होता.