For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेपो दरात वाढ न करण्याचे तज्ञांचे मत

06:10 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेपो दरात वाढ न करण्याचे तज्ञांचे मत
Advertisement

रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती बैठक सुरु: बुधवारी होणार निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

भारतीय रिझर्व्ह बँकेची द्विमासिक बैठक सोमवार 6 एप्रिलपासून सुरू झाली असून 8 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक रेपोदराबाबत निर्णय जाहीर करणार आहे. सदरच्या बैठकीमध्ये रिझर्व्ह बँक कोणता निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक तज्ञांनी रेपो दरात वाढ केली जाऊ नये, असे मत मांडले आहे.

Advertisement

अनेक अर्थतज्ञांच्या मते रेपो दरामध्ये वाढ केली जाऊ नये. जोपर्यंत महागाई वाढत नाही तोपर्यंत तरी रेपो दरामध्ये कपात केली जाऊ नये अशा प्रकारची प्रतिक्रिया अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सोमवार 6 एप्रिल रोजी सुरू झाली असून 8 एप्रिल रोजी आर्थिक वर्ष 2027 संदर्भातील पहिल्या बैठकीत रेपो दराचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. बँकेच्या अर्थतज्ञांच्या मते लगेचच रेपो दरामध्ये कपात करण्याची आवश्यकता नाही आहे.

महागाई, चलनाचा दबाव

सध्याला महागाई नियंत्रणात असून ती नियंत्रणाबाहेर गेल्यास रेपो दरात वाढीबाबतचा निर्णय घेता येईल. चलनावरील दबाव कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विविध उपाययोजना सध्याला करते आहे. पश्चिम आशियातील अमेरिका-इराण युद्धाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्याला अस्थिरतेचे वातावरण आहे. याआधी म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या रिझर्व्हच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आला होता. फेब्रुवारीत रेपो रेट 5.25 टक्के इतका होता. फेब्रुवारी 2025 पासून पाहता रिझर्व्ह बँकेने 125 बेसीस पॉइंटसने कपात केलेली आहे.

काय होणार बैठकीत

या बैठकीत बुधवार 8 एप्रिल रोजी बँक रेपो दराबाबत निर्णय घेणार आहे. विविध तज्ञांची मते, पतधोरण समिती सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर रेपो दराचा निर्णय घेतला जाईल. रेपो दर जैसे थे ठेवला जाण्याचीच शक्यता अधिक दिसते. कपातीचा निर्णय घेतला जाणार नाही असाच एकंदर सूर वाटतो आहे.

नव्या आर्थिक वर्षातील पहिली बैठक

रेपो दर जैसे ठेवण्याचे संकेत

महागाईवर नियंत्रणाचे रिझर्व्हचे उपाय

Advertisement
Tags :

.