For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दूधगंगा धरणाच्या गळतीची तज्ञ समितीकडून क्षेत्रीय पाहणी

12:32 PM Dec 23, 2024 IST | Pooja Marathe
दूधगंगा धरणाच्या गळतीची तज्ञ समितीकडून क्षेत्रीय पाहणी
Experts Inspect Dudhganga Dam Leakage
Advertisement

गळती प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामास प्रत्यक्षात
जानेवारी 2025 मध्ये सुरुवात होणार
कोल्हापूर
दूधगंगा दगडी धरणातील गळती प्रतिबंधक उपाययोजनेच्या कामास जानेवारी 2025 मध्ये सुरुवात करुन जून 2025 अखेर सिंचनाकरिता आवश्यक पाणीसाठ्याचे नियोजन करुन प्रायमरी व सेकंडरी ड्रिलिंग तसेच ग्राऊटिंगचे काम करण्याचे नियोजन आहे. गळती प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामाचे नियोजन करण्यात आले असून ते काम करण्यात येणार असून गठित केलेल्या समितीकडून 24 रोजी क्षेत्रीय पाहणी करण्यात येणार आहे अशी माहिती दूधगंगा कालवे विभाग क्र.1. च्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.
सन 2006 पासून या धरणात पूर्ण क्षमतेने म्हणजेच 25.40 अ.घ.फु. इतका पाणीसाठा करण्यात येत असून सद्यस्थितीत कोल्हापूर जिह्यातील 41 हजार हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येत आहे व प्रकल्पाच्या आंतरराज्यीय करारानुसार कर्नाटक राज्यास नदी/ कालवा या माध्यमातून 4 अ.घ.फु. पाणी देण्यात येते.
धरण प्रकल्पाचा सांडवा व काही भाग (490 मीटर लांबी) हा दगडी बांधकाम प्रकाराचा असून या भागातून धरणामध्ये प्रथम साठा करण्यात आला. तेव्हापासून म्हणजे सन 2007 पासून गळती निदर्शनास आली आहे. सुरुवातीस ती 360 लि. से. इतकी नोंदविण्यात आली. तर सन 2010 ते 2014 मध्ये गळती प्रतिबंधक उपाय योजनेचे काही प्रमाणात काम करण्यात आल्याने सन 2016 मध्ये ती किमान 166 लि./से. इतकी निदर्शनास आली.सन 2021-22 च्या हंगामात दगडी धरणातील गळती पुन्हा साधारणत: 350 लि./से. इतकी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे जलसंपदा विभागांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व केंद्र शासनाच्या सीडब्लयू अॅन्ड पीआरएस या संस्थेकडून पहाणी करुन याबाबत अभ्यास करण्यात आला.त्याप्रमाणे गळती ही धरणाच्या पूर्ण अंगास छेद देऊन खालील बाजूस पाणी उसळत असल्याने,धरणास उर्ध्व बाजुस काँक्रीट सेप्टम नसल्याने धरणाच्या बांधकामाची घनता कमी झाल्याने निदर्शनास आलेली गळती 350 लि. से. ही जास्त प्रमाणात आहे.यामुळे
जलसंपदा विभाग पुणे मुख्य अभियंता यांच्या पाहाणीनंतर धरणाच्या स्थैर्यता व सुरक्षिततेकरिता गळती प्रतिबंधक उपाय योजनेचे कामासाठी सर्व प्रशासकीय मान्यता पूर्ण करुन प्रत्यक्ष हाती घ्यावे, अशा सुचना दिल्या आहेत.
दरम्यान ही गळती रोखण्याकरिता सर्व आवश्यक चाचण्या, अभ्यास विविध संस्था यांच्याकडून पूर्ण करण्यात आल्या आहेत. सुचविण्यात आलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणण्याकरिता ग्राऊटिंग व इतर बांधकाम करण्यासाठी 80.72 कोटी इतक्या रक्कमेच्या प्रस्तावास 27 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. निविदे संदर्भातील सर्व मान्यता घेऊन निविदा कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबर 2024 रोजी गळती प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामाचे आदेश देण्यात आलेले आहेत.या पार्श्वभूमीवर ठेकेदाराकडून मनुष्यबळ व आवश्यक ती यंत्रसामुग्री धरणस्थळी तैनात करण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार या कामाकरिता महामंडळ कार्यालयाकडून 13 डिसेंबर 2024 रोजी तज्ञांची समिती गठीत करण्यात आली आहे. सद्या धरणामध्ये 667.01 दलघमी इतका पाणीसाठा आहे. तसेच त्याद्वारे सिंचनाचे नियोजनसुध्दा असल्यामुळे गळती प्रतिबंधक कामाचे नियोजन करण्याकरीता 24 डिसेंबर रोजी तज्ञ समितीची क्षेत्रीय पाहणी होणार आहे.
जानेवारी 2025 मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी कळवले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.