For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एक दिवस वारी’त मिळाली संतविचारांची अनुभूती

04:02 PM Jun 27, 2025 IST | Radhika Patil
‘एक दिवस वारी’त मिळाली संतविचारांची अनुभूती
Advertisement

पुणे :

Advertisement

‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करत वारीतील आपुलकी, प्रेम, मानवता, समता, बंधुता या मूल्यांची अनुभूती ‘एक दिवस वारी’तील कार्यकर्ते, मान्यवर यांनी घेतली. संविधानातील मूल्ये आणि संत विचारातील परस्परपूरकता अनुभवल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

गेली 12 वर्षांपासून ‘एक दिवस तरी वारी अनुभवावा’ हा उपक्रम आयोजित केला जातो. यंदाही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यवत ते वरवंडदरम्यान एक दिवस वारी हा उपक्रम झाला. भांडगाव येथे दत्ता बोरकर यांच्या निवासस्थानी विश्रांती आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी भेट दिली. कार्यक्रमात अजात संप्रदायाचे गणपती महाराज यांच्या डॉ. बाळ पदवाड लिखित चरित्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संत तुकडोजी महाराजांचे वारसदार सुबोधदादा महाराज, ‘एक दिवस वारी’चे अविनाश पाटील, विशाल विमल, संविधान समता दिंडीचे संयोजक हभप शामसुंदर सोन्नर, हभप हरिदास तम्मेवार उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.