For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतरण प्रक्रियेला गती

10:47 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंटच्या हस्तांतरण प्रक्रियेला गती
Advertisement

संरक्षण मंत्रालयाकडून कमिटी स्थापन, महिनाभराची मुदत

Advertisement

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण करण्यासाठीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. कर्नाटकातील एकमेव असणाऱ्या बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतरणासाठी संरक्षण मंत्रालयाने कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीला महिनाभराचा कालावधी देण्यात आला असून अहवाल सादर करावा लागणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड चालविणे संरक्षण मंत्रालयाला जिकिरीचे होत असल्याने स्थानिक महानगरपालिकांमध्ये हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून होता. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचेही महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण केले जाणार होते. यासाठीची प्रक्रिया सुरू होती. परंतु, कॅन्टोन्मेंट बोर्डच्या माजी सीईओंनी योग्य प्रतिसाद न दिल्याने ही प्रक्रिया रखडली होती. अखेर संरक्षण मंत्रालयाने कर्नाटक सरकारला पत्र पाठवून सीमा निश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत. या कमिटीमध्ये राज्यातील वरिष्ठ अधिकारी, पुणे येथील सदर्न कमांडचे संचालक, कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष, तसेच सीईओ यांचा समावेश आहे. या समितीला कॅन्टोन्मेंट बोर्डमधील जागा, महत्त्वाच्या स्थावर मालमत्ता, कर्मचारी, पेन्शनर्स, कॅन्टोन्मेंटचा निधी, सिव्हिल सर्व्हिस, स्टोअर्स, रस्ता व्यवस्थापन, ट्रॅफिक व रेकॉर्ड या सर्वांची इत्यंभूत माहिती संरक्षण मंत्रालयाला द्यावी लागणार आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र

Advertisement

मागील अनेक दिवसांपासून हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली होती. परंतु, आता संरक्षण मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठविल्यामुळे ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी लागणार आहे. संरक्षण मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले असून महिनाभरात अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Advertisement
Tags :

.