महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेगवान व्हिसा योजना कॅनडाकडून बंद

06:49 AM Nov 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / ओटावा 

Advertisement

कॅनडामध्ये शिकण्यासाठी वेगवान व्हिसा देण्याची योजना त्या देशाच्या प्रशासनाने बंद केली आहे. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना असुविधा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तथापि, केवळ भारतातील नव्हे, तर अन्य 13 देशांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. आता भारतासह या 13 देशांमधील विद्यार्थ्यांनाही काही प्रमाणात अडचण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

ही योजना 2018 मध्ये सुरु करण्यात आली होती. भारत, चीन, पाकिस्तान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम आदी देशांमधील विद्यार्थ्यांसाठी ती विशेषत्वाने लाभदायक ठरत होती. या योजनेमुळे कॅनडाचा व्हिसा विनाविलंब मिळण्याची सोय उपलब्ध होती. या योजनेचा लाभ प्रतिवर्षी हजारो विद्यार्थ्यांना होत होता. भारतासाठी ही योजना अधिक लाभदायक ठरताना दिसत होती. तथापि, सध्या भारत आणि कॅनडा या देशांमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला आहे. या तणावामुळे ही योजना बंद केली गेली आहे, असे काही तज्ञांचे मत आहे. काही विशिष्ट देशांच्या नव्हे, तर सर्वच देशांच्या विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, यासाठी ही योजना बंद करण्यात आली आहे, असे कारण कॅनडाच्या शिक्षण विभागाने दिले आहे.

पूर्वीचे अर्ज स्वीकारणार

ही योजना बंद होण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज पेले आहेत, त्या अर्जांसंबंधीची प्रक्रिया याच योजनेअंतर्गत पूर्ण केली जाईल. या नंतर जे अर्ज येतील ते नव्या पद्धतीनुसार प्रक्रियाकृत केले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. नेहमीच्या पद्धतीनुसार अर्ज केला गेला तरी उत्पन्न हमी योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, अर्ज स्वीकारण्यास किती विलंब लागेल त्याविषयी खात्री नाही, हे स्पष्ट आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article