For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : कोल्हापूर सर्किट बेंचचा विस्तार; लवकरच नवीन डिव्हिजन आणि सिंगल बेंच सुरू होणार

05:19 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापूर सर्किट बेंचचा विस्तार  लवकरच नवीन डिव्हिजन आणि सिंगल बेंच सुरू होणार
Advertisement

                     न्यायमूर्ती एम. एम. साठ्ये यांनी तिसऱ्या सिंगल बेंचचा कार्यभार स्वीकारला

Advertisement

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये तिसरे सिंगल बेंच सोमवारपासून (दि. २) सुरू झाले. तिसऱ्या सिंगल बेंचचा न्यायमूर्ती म्हणून एम. एम. साठ्ये यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. दरम्यान, लवकरच आणखी एक डिव्हिजन बेंच आणि एक सिंगल बेंच सुरू होणार असून, खंडपीठाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाउल आहे.

कोल्हापूर सर्किट बेंचचे १८ औं गस्ट२०२५ रोजी उद्घाटन झाले. यावेळी सर्किट बेंचमध्ये एक डिव्हिजन आणि दोन सिंगल बेंचचे कामकाज सुरू होते. सर्किट बेंचमध्ये दाखल झालेल्या खटल्यांची संख्या लक्षात घेऊन सर्किट बेंचचा विस्तार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार सोमवारपासून आणखी एक सिंगल बेंच कार्यान्वित करण्यात आले.

Advertisement

न्यायमूर्ती एम. एम. साको यांनी सिंगल बेचचे कामकाज सुरू केले. लवकरच आणखी एक डिव्हिजन बेंच आणि एक सिंगल बेंचचे कामकाज सुरू होणार आहे. त्यासाठी कोर्ट रूमची पूर्तता करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. सध्या न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि अजित कडेठाणकर यांच्या डिव्हिजन बेचसह न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी, न्यायमूर्ती वृषाली जोशी आणि न्यायमूर्ती एम. एम. साठचे यांच्या सिंगल बेंचद्वारे कामकाज सुरू आहे.

Advertisement
Tags :

.