For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Circuit Bench expansion | कोल्हापूर सर्किट बेंचचा विस्तार; दुसऱ्या डिव्हिजन बेंचला मंजुरी

01:57 PM Mar 01, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur circuit bench expansion   कोल्हापूर सर्किट बेंचचा विस्तार  दुसऱ्या डिव्हिजन बेंचला मंजुरी
Advertisement

               कोल्हापूर खंडपीठाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल

Advertisement

कोल्हापूर- मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा विस्तार होत असून, शनिवारी सर्किट बेंचमध्ये दुसऱ्या डिव्हिजन बेंचला मंजुरी मिळाली आहे. गुरुवार, ४ मार्चपासून या डिव्हिजन बेंचचे कामकाज सुरु होणार आहे. आठवड्यातून तीन दिवस कामकाज हे सुरु राहणार आहे. या डिव्हिजन बेंचसमोर २०२० नंतरच्या दिवाणी याचिका, २०२१ नंतरच्या फौजदारी याचिका तसेच २०१० नंतरच्या बें फौजदारी अपिलांचे काम चालणार आहे. कोल्हापूर येथे खंडपीठ होण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

१८ ऑगस्ट २०२५ रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मंजूर झाले.यानंतर कोल्हापूर खंडपीठाची मागणी जोर धरु लागली आहे. सर्किट बेंचचे खंडपीठ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्याबाबतचा पाठ्पुरावाही सुरु आहे. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये दोन नवीन स्वतंत्र न्यायमूर्तीची नियुक्ती केल्यामुळे सर्किट बेंचचा आणखीन विस्तार झाला आहे. शनिवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दुसऱ्या डिव्हिजन बेंचला मंजुरी मिळाली आहे.
न्यायमूर्ती रणजिसिंह राजा भोसले यांच्यासह न्यायमूर्ती वृषाली जोशी हे डिव्हिजन बेंच दोनचे काम पाहणार आहेत. सर्किट बेंचच्या तिसऱ्या मजल्यावरील रुमनंबर पाचमध्ये डिव्हिजन बेंचचे कामकाज चालणार आह. आठवडयातील तीन दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवारी या बॅचचे काम सुरु राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयातील मुख्यपीठ येथे कार्यरत असलेले न्यायमूर्ती माधव जामदार आणिन्यायमूर्ती रणजिसिंह राजा भोसले यांच्यासह नागपूर खंडपीठातील स्ट न्यायमूर्ती प्रवीण पाटील, औरंगाबाद ना खंडपीठातील न्यायमूर्ती सचिन देशमुख हे सर्किट बेंचमध्ये येणार आहेत.

दुसऱ्या डिव्हिजन बैंचच्या मंजुरीमुळे कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये ब्ल आता २ डिव्हिजन बेंच आणि चार न्चे सिंगल बेंच निर्माण झाले आहेत. 5. पहिल्या डिव्हिजन बैंचचे कामकाज न्य न्यायमूर्ती माधव जामदार आणि री न्यायमूर्ती प्रविण पाटील यांच्यासमोर चालणार आहे. तर न्यायमूर्ती वृषाली ब्ल जोशी या सिंगल बेंच १. न्यायमूर्ती ब्ले एम. एम. साठ्ये हे सिंगल बेंच २. ण न्यायमूर्ती सचिन देशमुख सिंगल बेंच ३ तर न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोसले हे सिंगल बेंच ४ थे कामकाज पाहणार आहेत. गेल्या दोन महिन्यात कोल्हापूर सर्किट बेंचचा दुसऱ्यांदा विस्तार झाला आहे. यामुळे खंडपीठाच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.