For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र, गोव्यात 3,400 हून अधिक नवीन 5जी साइट्ससह विस्तार : एअरटेल

06:30 AM Apr 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र  गोव्यात 3 400 हून अधिक नवीन 5जी साइट्ससह विस्तार   एअरटेल
Advertisement

`

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलकडून मागील 12 महिन्यात महाराष्ट्र आणि गोव्यात 3,400 हून अधिक नवीन 5जी साइट्स उभारण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना अधिक वेगवान इंटरनेट, व्यापक कव्हरेज आणि सुधारित नेटवर्क अनुभव मिळत असल्याचे भारती एअरटेलने म्हटले आहे.

Advertisement

‘महाराष्ट्र आणि गोव्यात डेटा वापराची मागणी वेगाने वाढत आहे आणि आमचे उद्दिष्ट या मागणीपेक्षा पुढे राहण्यासाठी सतत आमचे नेटवर्क अधिक मजबूत करणे आहे. आम्ही 2.2 कोटीहून अधिक ग्राहकांना अधिक वेगवान स्पीड, व्यापक कव्हरेज आणि अधिक विश्वासार्ह अनुभव देत आहोत. “विकासशील जिह्यांमध्ये आमची सातत्यपूर्ण गुंतवणूक, कनेक्टिव्हिटीतील कमतरता दूर करून भविष्याभिमुख नेटवर्कच्या माध्यमातून प्रदेशाच्या डिजिटल विकासाला बळकटी देण्यासाठी कंपनी प्रतिबद्ध आहे,““ असे रबी शंकर मिश्रा, सीईओ, महाराष्ट्र व गोवा, भारती एअरटेल यांनी सांगितले. ग्रामीण आणि अर्ध-शहरी भाग, महामार्ग, सीमावर्ती क्षेत्रे तसेच प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक कॉरिडॉरमध्ये नेटवर्कची घनता वाढवण्यासाठी सातत्याने गुंतवणूक करत, एअरटेल उच्च गतिशीलता आणि जास्त वापर असलेल्या क्षेत्रांमध्येही मजबूत आणि भविष्यसिद्ध कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करत आहे.

हा नेटवर्क विस्तार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र आणि गोव्याच्या सर्व 36 जिह्यांमध्ये करण्यात आला आहे. दररोज 9 पेक्षा अधिक नवीन साइट्स सक्रिय होत असले, तरीही कोणत्याही अडथळ्यांशिवाय स्ट्रीमिंग, जलद डाउनलोड, ऑनलाइन काम व शिक्षण, तसेच अधिक विश्वासार्ह डिजिटल पेमेंटचा अनुभव घेऊ शकतात.

Advertisement

.