आहेत ते रस्ते अपग्रेड करून शक्तिपीठाला जोडले जातील- आमदार महाडिक
कोल्हापूर
राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून कोल्हापूर महानगर पालिकेला जो निधी येतो, या निधी ची कामे कुठवर आली आहेत? या अंतर्गत अमृत टप्पा -१, अमृत टप्पा -२, नगरोत्थान अस अनेक विषयांसंदर्भातील कामे कुठवर आली आहेत. कोल्हापूर शहर स्वच्छतेसाठी दिलेला निधी या संदर्भात कामकाज सुरू आहे. यामध्ये पंचगंगेचे प्रदुषण, कोल्हापूर शहरातील प्रदुषण, श्री अंबाबाई मंदिर चा आराखडा यांशिवाय शहरातील नागरिकांना भेडसावणारे विविध विषय या संदर्भात आज बैठक घेण्यात आली, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, कोल्हापूरातील सीसी टीव्ही, प्रॉपर्टी कार्ड, स्ट्रीट लाईट, कचरा व्यवस्थापन, चेंबर ऑफ कॉमर्सचे विषय असे दहा ते बारा विषयांवर ही बैठक झाली. या बैठकीत अनेक कामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी नेमणूक आणि प्रत्येक कामाला वेळेचे बंधन असे निश्चित करण्यात आले आहे.
पाणी पुरवठ्याविषयी बोलताना आमदार महाडीक म्हणाले, अमृत टप्पा-१ आणि अमृत टप्पा -२ यांमध्ये किमान ३० किलोमीटर ची लाईन अजून टाकणे बाकी आहे. या कामकाजाचा आढावा आज बैठकीत घेतला. त्यानुसार जानेवारी ऐवजी ५ मार्च रोजी ७ टक्क्यांमधून वितरण सुरु करून ट्रायल घेतली जाईल. प्रत्येक सोमवारी लाईट नसताना हे काम केले जाते. नागरिकांची गैरसोय न होता, पाणी व्यवस्थापन आणि वितरणाचे काम केले जात आहे.
पुढे शहरातील रस्त्यांविषयी बोलताना ते म्हणाले, यासंदर्भात पाणी पुरवठा, गॅस लाईल किंवा इतर कोणतीही केबल लाईन टाकण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे, या ठिकाणीचे रस्त्याचे काम थांबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. केबल लाईन टाकण्याचे कामकाज पूर्ण झाल्यानंतरच रस्ते करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत.
शक्तिपीठ महामार्गाविषयी विचारणा झाली असताना आमदार महाडिक म्हणाले, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तसेच ज्याठिकाणी या महामार्गाला विरोध आहे, त्या हे मार्ग जाणार नाहीत असे त्यांनी जाहीररित्या सांगितलेले आहे. पण ज्याठिकाणी ते रस्ते आहेत, ते अपग्रेट करून शक्तिपीठाला जोडणे ही त्यांची भूमिका आहे. शक्तीपीठासंदर्भातील अधिकार हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहेत. ज्याठिकाणी सकारत्मकता तिथपर्यंत हा महामार्ग करतील, याशिवाय जिथे विरोध आहे, तिथे चर्चा करून हा मार्ग काढतील.
केशवराव भोसले सभागृहाचे कामकाज गेले दहा दिवस पूर्णपणे ठप्प आहे. यासंदर्भात आमदार महाडिक म्हणाले, मी याविषयीची माहिती मागवली आहे. परंतु माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. तरीही राज्यसरकारने केशवराव भोसले सभागृहासाठी २५ कोटी दिलेले आहेत. त्यामुळे त्याचे काम लवकरात लवकर चालू होईल. यासंदर्भात जे काही प्रश्न आहेत, ते सोडवून काम पूर्ण करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत.
याशिवाय कोल्हापूर शहराच्या दोन्ही पाणी पुरवठा योजना चालू राहण्यासाठीही त्याचा डीपीआर बनवून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती आमदार अमल महाडिक यांनी यावेळी दिली.