For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : ऐतिहासिक वाघनखांच्या प्रदर्शनाचे उद्या उद्घाटन

11:28 AM Oct 27, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   ऐतिहासिक वाघनखांच्या प्रदर्शनाचे उद्या उद्घाटन
Advertisement

'         शिवशस्त्र शौर्यगाथा'चे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Advertisement

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी वाघनखे सरकारच्या वतीने लंडन येथून आणल्या आहेत. ही वाघनखे ऑक्टोंबर २०२५ ते मे २०२६ पर्यंत कोल्हापूरातील लक्ष्मी बिलास पॅलेस येथे ठेवण्यात येणार आहेत. मंगळवारी, २८ रोजी सकाळी १० बाजून ४५ मिनीटांनी सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती महाराज, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार व रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, आमदार राजेश क्षिरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार जयंत आसगांवकर, आमदार अरुण लाड, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमादार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोक माने, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहुल आवाडे प्रमुख उपस्थित असणार आहेत.

Advertisement

महाराष्ट्र शासनाच्या विशेष प्रयत्नातून लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून ही बाघनखे ३ वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्यात आली आहेत. ही दुर्मिळ वाघनखे नागरिकांना पाहता यावीत, यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचे प्रदर्शन भरवले जात आहे. साताऱ्यातून ही बाघनखे ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर येथे आणली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटनासाठी याचे प्रदर्शन थांबले होते. पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाने या प्रदर्शनाचे नियोजन केले आहे.

मात्र आता मंगळवारी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ही वाघनखे २ मे २०२६ पर्यंत कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ, म्हणजे लक्ष्मी-विलास पॅलेस येथे 'शिवशस्त्र शौर्यगाथा' प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. या काळात जिल्ह्यातील विविध शाळांचे विद्यार्थी तसेच नागरीकांना ही बाघनखे पाहता येणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

Advertisement
Tags :

.