महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मळगावात किल्ले व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन

04:24 PM Nov 11, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

अष्टविनायक कला - क्रिडा मंडळाच्यावतीने १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान उपक्रम

Advertisement

न्हावेली / वार्ताहर

Advertisement

मळगाव रस्तावाडी येथील अष्टविनायक कला - क्रिडा मंडळाच्यावतीने एक अनोखा असा उपक्रम राबविण्यात आला असून प्रथमच भव्य दिव्य असे किल्ले व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन रविवार १२ ते मंगळवार १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
मळगाव येथील सुभाष नाटेकर यांच्या निवासस्थानी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रोज सायंकाळी ४.३० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार असून यात काही निवडक किल्ले प्रदर्शन, ऐतिहासिक वस्तू व माहिती यांचे प्रदर्शन, मातीपासुन बनविलेल्या महाराष्ट्रातील काही निवडक गड-किल्ल्यांची प्रतिकृती तसेच ऐतिहासिक वस्तू व माहिती देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ज्ञानेश्वर राणे- ७५८८५७०५१२, प्रथमेश खडपकर - ८०१००८७६२१ यांच्याशी संपर्क साधावा. या शिव इतिहासाचा सुवर्णयोग अनुभवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अष्टविनायक कला-क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# malgao # Exhibition of forts and historical objects#
Next Article