For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय महिलेच्या साडीचे अमेरिकेत प्रदर्शन

06:31 AM May 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय महिलेच्या साडीचे अमेरिकेत प्रदर्शन
Advertisement

भारतातील एका महिलेच्या साडीला अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथील स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमने स्वत:च्या नव्या प्रदर्शनात सामील केले आहे. ही साडी सध्या चर्चेत आली आहे. ही साडी प्रत्यक्षात इस्रो वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ यांची आहे. हरिनाथ या भारतात ‘रॉकेट वुमन’ नावाने प्रख्यात आहेत. भारताच्या ऐतिहासिक मंगळयान मोहिमेचे नेतृत्व करत असताना नंदिनी यांनी ही साडी परिधान केली होती.

Advertisement

हरिनाथ यांनी इस्रोमध्ये 14 हून अधिक मोहिमांमध्ये योगदान दिले आहे. आता स्मिथसोनियन म्युझियमच्या अधिकृत हँडलने या साडीचे प्रदर्शनातील छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

Advertisement

मंगळयान मोहिमेत भूमिका

एक रॉकेट वैज्ञानिक आणि मार्स ऑर्बिटर मिशनच्या उपसंचालिका म्हणून हरिनाथ मिशनचे नियोजन आणि संचालनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होत्या. 6-10 महिन्यांच्या स्वत:च्या मिशनपेक्षा अधिक काळापर्यंत अंतराळ यानाने मंगळाचा पृष्ठभाग आणि वायुमंडळाचे डॉक्यूमेंटेशन करत कक्षेत 8 वर्षे घालविली होती असे म्युझियमने नमूद केले आहे.

इस्रोच्या टीमच्या यशाने भारताला मंगळ ग्रहावर पोहोचणारा पहिला देश अणि जगातील चौथ्या देशाचा मान मिळवून दिला. या मिशनचे नेतृत्व करणाऱ्या महिला वैज्ञानिकाने परिधान केलेली साडी त्यांची राष्ट्रीय ओळख आणि अंतराळात भारताच्या यशाचे प्रतीक ठरल्याचेही म्हटले गेले आहे. तर छायाचित्रात एका डमीमध्ये गुंडाळण्यात आलेली साडी दिसून येतेय.

नंदिनी हरिनाथ कोण?

नंदिनी हरिनाथ यांची आई गणिताची शिक्षिका तर वडिल इंजिनियर होते. नंदिनी यांनी इंजिनियरिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच त्या इस्रोशी संबंधित वैज्ञानिक असून त्यांनी मंगळयान प्रकल्पात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Advertisement
Tags :

.