मळगाव मराठा समाज बांधवांची कार्यकारिणी बैठक संपन्न
अध्यक्षपदी संदीप राऊळ तर उपाध्यक्षपदी गुरुनाथ गावकर
न्हावेली / वार्ताहर
मळगाव मराठा समाज बांधवांची कार्यकारिणी बैठक मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या हेमंत, शैलजा परब सभागृहात मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक, माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ, मदन राऊळ, यशवंत लातये, एकनाथ लातये या प्रमुख मराठी बांधवांच्या उपस्थितीत पार पडली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संदीप राऊळ तर उपाध्यक्षपदी गुरुनाथ गावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जी चळवळ सुरु केली आहे, त्यांना समर्थन देण्यासाठी व मळगाव मराठा समाजाची वाडीनुसार नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी समीर परब, दिवकर राऊळ यांनी आपले सुंदर विचार मांडले. यावेळी गुरुनाथ गावकर, एकनाथ गावडे, समीर परब, संदीप राऊळ, सुधीर राऊळ, धोंडू सावंत सुनील राऊळ, निलेश चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष-संदीप राऊळ, उपाध्यक्ष- गुरुनाथ गावकर, सचिव- समीर परब, सहसचिव- रितेश राऊळ, खजिनदार-सुधीर राऊळ, सल्लागार-दिवाकर राऊळ, बाळकृष्ण मुळीक, एकनाथ गावडे, सदस्यपदी- रेल्वेस्टेशन - गोविंद राऊळ, रोहित राऊळ, रस्तावाडी- शंकर होळकर, शेखर राऊळ, निलेश चव्हाण, तेलकाटावाडी- सहदेव राऊळ, पुरुषोत्तम राऊळ, उदय राऊळ, सुतारवाडी-रंजन केणी, बाबुराव कानसे, माळीचे घर(वरची देऊळवाडी- सतीश राऊळ . सुनील राऊळ, अर्जुन राऊळ, संदेश राऊळ, खालची देऊळवाडी-सुनील राऊळ, धोंडू सावंत, प्रकाश राऊळ, प्रसाद गावकर, प्रकाश राऊळ, कुंभारवाडी-शंकर राऊळ, पिंपळवाडी-जयगुरू राऊळ, ब्राम्हणआळी-विनायक राणे, सतीश राऊळ, राकेश परब, मदन राऊळ, मधुसूदन राऊळ आदींची निवड करण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे उपस्थित मराठा बांधवांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समीर परब यांनी केले. या कार्यकारिणी बैठकीला मोठ्या संख्येने मराठी बांधव उपस्थित होते.