For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय कर्मचारी सेनेची सावंतवाडी आगारात कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रीय कर्मचारी सेनेची सावंतवाडी आगारात कार्यकारिणी जाहीर
Advertisement

सावंतवाडी वार्ताहर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सावंतवाडी आगारात राष्ट्रीय कर्मचारी सेनेची कार्यकारिणी स्थानक प्रमुख सौ. गौतमी कुबडे यांच्याकडे अधिकृतपणे सादर करण्यात आली.

Advertisement

ही कार्यवाही शिवसेना जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय कर्मचारी सेना, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शिवसेना जिल्हा सचिव तथा राष्ट्रीय कर्मचारी सेना, सावंतवाडी आगार अध्यक्ष श्री. परीक्षित मांजरेकर प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष श्री. बाबा नाईक, उपाध्यक्ष श्री. धनराज कासार, सचिव श्री. शिवराम मुळीक, संघटक सचिव श्री. तुळशीदास पवार, खजिनदार श्री. संतोष देसाई, तसेच श्री. तेजस सावंत, श्री. प्रथमेश देसाई, श्री. सुधीर गवस, श्री. सुनील गुंजाळ, श्री. रवींद्र परब, श्री. व्ही. एम. परब आणि श्री. भरत गोसावी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान संघटनेची कार्यकारिणी स्थानक प्रमुखांकडे अधिकृतपणे सादर करण्यात आली. यावेळी कर्मचारी हिताशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.