For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री गावडेंच्या ‘ऑडिओ’ने खळबळ

11:44 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंत्री गावडेंच्या ‘ऑडिओ’ने खळबळ
Advertisement

मुख्यमंत्री, सभापतींना अपशब्द: ऑडिओ खरा की खोटा?: संपूर्ण राज्यात खळबळ

Advertisement

पणजी : आपल्या बेधडक आणि उग्र वागण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे आणि आदिवासी खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांच्या संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने खळबळ माजली आहे. ऑडिओत मंत्री गावडेंच्या आवाजातील व्यक्ती संचालकांना धमकी देतेय, मुख्यमंत्र्यांबद्दल तसेच सभापतींविऊद्ध अपशब्द काढते. आदिवासी विकास महामंडळाच्या अध्यक्षाला सांगा कार्यक्रम कऊनच दाखवा, कापून काढीन अशा आशयाचे भाषण ऑडिओतून उघड झाल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. मंत्री गोविंद गावडे यांच्या प्रियोळ मतदारसंघातील एका संस्थेतर्फे कार्यक्रम आयोजित केला होता. त्या संस्थेला आदिवासी विकास महामंडळातर्फे अनुदान दिले होते. मुख्dयामंत्री तसेच आदिवासी विकास महामंडळाचे चेअरमन आणि संचालक उपस्थित राहणार होते. मंत्री तथा स्थानिक आमदार गोविंद गावडे यांना कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या मंत्री गावडेंनी आदिवासी खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांना फोन कऊन जे काही रागाने बोलले त्यातून मंत्री गोविंद गावडे यांचा तोल गेल्याचे दिसते.

अन्यथा कापून काढू

Advertisement

ऑडिओत मंत्र्यांनी संचालकांना सांगितले की, उद्या तो कार्यक्रम होता कामा नये. तुम्ही कोणीही त्या कार्यक्रमाला जायचे नाही. त्या मुख्यमंत्र्याला सांगा की येऊ नका. माझे हे निवेदन त्यांना याच शब्दात कळवा. ऑडिओतील या नंतरचे शब्द अत्यंत गंभीर स्वऊपाचे असून ते गाळण्यात आले आहेत. संचालक रेडकर हे मंत्र्यांना शांतपणे समजविण्याचा प्रयत्न करतात. अशी अभद्र भाषा आपण का वापरता? असा सवाल करतात. मात्र मंत्री कडक शब्दात धमकी देतात. हा कार्यक्रम होता कामा नये, नाहीतर गप्प बसणार नाही. भयंकर परिस्थिती उद्भवणार, कापून काढू, असा इशारा ऑडिओतून देण्यात आलेला आहे.

ऑडिओ महिन्याभरापूर्वीचा

प्राप्त माहितीनुसार, हा ऑडिओ सुमारे 1 महिन्याभरापूर्वीचा असावा. गोवा विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या बंगल्यावर पणजीत मंत्री गोविंद गावडे आणि सभापती तवडकर यांना बोलावून आपसातील मतभेद व भांडणे मिटवण्यास सांगितेल होते. प्रदेश भाजप अध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे यांनाही त्याठिकाणी पाचारण करण्यात आले होते. त्या ठिकाणी हे भाषण सर्वांनाच ऐकविण्यात आले होते. प्रदेश भाजप अध्यक्ष तानावडे यांनी मंत्री गोविंद गावडे यांना असले वर्तन मुळीच खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला होता.

ऑडिओ समाजमाध्यमांत पोहोचल्याने खळबळ

महिन्याभरापूर्वीचा हा ऑडिओ संपूर्ण गोवाभरात पंतप्रधान गोव्यात असतानाच प्रसारित झाला. संपूर्ण गोव्यात तो सर्वत्र समाजमाध्यमांतून पोहोचला आणि एकच खळबळ माजली. जे जनतेला माहीत नव्हते ते देखील उघड झाले. या मंत्र्याला मुख्dयामंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वारंवार पाठीशी घातले. आता देखील हा ऑडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर मंत्री गोविंद गावडे यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

मंत्री गावडेंविरोधात तक्रार दाखल

कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाच्या अध्यक्षांना जीवे मारण्याची कथित धमकी दिल्याप्रकरणी गोवा काँग्रेस समितीने पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी एसडीपीओ पणजी सखोल तपास करणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती उत्तर गोवा अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. तक्रार दाखल करतेवेळी रामकृष्ण जलमी, विजय भिके, जीतेंद्र गावकर, जॉन नाझारेथ व अन्य कंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री गोविंद गावडे यांचे मौन?

या प्रतिनिधीने मंत्री गोविंद गावडे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे म्हणणे जाणून घेण्याचे प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. सदर ऑडिओ टेप ही खरी आहे की त्यांच्या आवाजाची नक्कल करण्यात आली आहे? असा प्रश्न होता मात्र मंत्री गावडे यांनी फोन घेतला नाही. मात्र या ऑडिओने गोव्याच्या भाजप अंतर्गत राजकारणाचा रंग जनतेला दिसून आला आहे.

Advertisement
Tags :

.