‘हीटेड रायवलरी’ वेबसीरिजची उत्सुकता
शत्रुत्वापासून रोमान्सपर्यंतचा प्रवास
कॅनेडियन स्पोर्ट्स रोमँटिक ड्रामा ‘हिटेड रायवलरी’ एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ओटीटीवर पाहता येणार आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी इमेज प्लस नेशन एलजीबीटीक्यू प्लस फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सीरिजे प्रदर्शनपूर्व स्क्रीनिंग करण्यात आले होते. या सीरिजमध्ये प्रेम, शत्रुत्व आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जाणारे दोन सर्वोत्तम क्रीडापटू आहेत. ही सीरिज रेचल रीड यांच्या गेम चेंजर्स कादंबरीवर आधारित आहे.
सीरिजची कहाणी रायवल टीमचा शेन आणि इल्याची (कॉनर स्टोरीची भूमिका) असून जे सुपरस्टार एनएचएल प्लेयर्स आहे, जे गेममध्ये परस्परांपेक्षा अत्यंत वेगळे आहेत परंतु रिंगमागे त्यांची एक दडलेली कहाणी असून त्याचा संबंध त्यांच्या किशोरवयाशी आहे. प्रत्यक्षात दोन्ही किशोरवयीन परस्परांवर प्रेम करत असतात. रिंगमध्ये ते शत्रू, प्रत्यक्ष आयुष्यात परस्परांवर प्रेम करत असतात.
स्वत:चे हे नाते ते जगापासून लपविणार का अधिकृत घोषणा करणार आणि यानंतर स्थिती काय असेल यावरच ही 6 एपिसोड्सच सीरिज गुंफण्यात आलेली आहे. ही वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म लायन्सगेट प्लेवर 20 फेब्रुवारीपासून पाहता येणार आहे.