For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अबकारी आयुक्तालयाकडून 70 जणांच्या अचानक बदल्या

02:45 PM May 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
अबकारी आयुक्तालयाकडून 70 जणांच्या अचानक बदल्या
Advertisement

 बदल्यामागे जनहितार्थ व प्रशासकीय कारणे असल्याचे स्पष्टीकरण

Advertisement

पणजी : गोवा अबकारी आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी 70 जणांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांना पेडणेपासून काणकोणपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी बदलीवर पाठविले आहेत. या बदल्यामागे जनहितार्थ आणि प्रशासकीय कारणे असल्याचे आदेशात म्हटले आहे. अबकारी आयुक्त कार्यालयाने बदली केलेल्या या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये अबकारी शुल्क रक्षक आणि साहाय्यक अबकारी शुल्क रक्षक यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना त्वरित कार्यमुक्त करावे, असे निर्देश संबंधित सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सध्या विविध तपासणी नाके (चेक पोस्ट) आणि बाह्य केंद्रांवर (आऊट पोस्ट) कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पुन्हा ऊजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अबकारी आयुक्त कार्यालयातर्फे उत्तर गोव्यात पणजी मुख्यालयासह पत्रादेवी, नईबाग, किरणपाणी, केरी, पेडणे, डिचोली, दोडामार्ग, तर दक्षिण गोव्यात पोळे, मोले, फोंडा, आदी प्रत्येक तालुक्यात कार्यालये आणि चेकपोस्ट कार्यरत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.