वाढता स्क्रीन टाईम देतोय धोक्याची घंटा...! मोंबाईलच्या अतिवापराने मेंदू संबधित आजारात होतेय वाढ
‘मोबाईलचा अतिवापर टाळा, आरोग्य सांभाळा’चा तज्ञांचा सल्ला : रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढणे, ह्दयविकार, गर्भाशयाचे आजार, डोके, मान, पाठ, डोळेदुखीसह चिडचिडेपणा वाढू लागला : पालकांनी सतर्क राहणे गरजेचे : मुलांमध्ये विचार व बोलण्याची क्षमता कमी होत असल्याचे तज्ञांचे निरिक्षण : लहान मुलांमध्ये मायोपिया व स्थूलता वाढण्याचा धोका
इम्रान गवंडी कोल्हापूर
आजकाल स्मार्टफोन आणि लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. लहान मुले रडू लागले, की पालक आपसुकच मुलांच्या हातात मोबाईल सोपवून जबाबदारी टाळतात. मुलेही शांत बसत असल्याने त्याकडे दुर्लक्षही होते. पण याच मोबाईलच्या अतिवापराने मेंदूच्या आजारात 5 टक्क्यांनी वाढ झाली असल्याने तज्ञांच्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे मोबाईलचा वाढता स्क्रीन टाईम आरोग्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा देत असुन ‘मोबाईलचा अतिवापर टाळा, आरोग्य सांभाळा’चा सल्ला देत आहेत.
अधुनिक विकसित झालेले तंत्रज्ञ, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स, 4जी, 5जीच्या स्मार्टफोनमुळे माणसाच्या आयुष्य सोपे झाले असले, याच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूशी निगडीत अनेक आजारांचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत तासांनतास मोबाईलमध्ये डोके घालून बसलेले असतात. यामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
साधारणत: 6 वर्षानंतर मेंदू विकसित होत असतो. मोबाईलच्या अतिरेकामुळे सर्वात जास्त मेंदूवर ताण पडतो. साधारणत: मेंदूला शरीराचा रिमोट कंट्रोल मानले जाते. त्याला विश्रांतीच मिळत नसेल तर रक्तदाब, हृदयविकार, हृदयाचे ठोके वाढणे, मानसिक स्वास्थ बिघडणे, चिडचिड, भावना मृत होणे, बुद्धीभ्रष्ट, डोके, पाठ, मान, डोळेदुखीसह काहीवेळा मेंदूचा स्ट्रोक (झटका) येण्याचा धोकाही उद्भवू शकत असल्याचे तज्ञांनी सांगितले.
वाढत्या स्क्रीन टाईमचा मुलांवर होणारा परिणाम
मुलांचे लक्ष विचलित होत आहे. वाढत्या वयासोबत गंभीर आजारांचा धोका उद्भवू लागला आहे. अधू दृष्टी, मायोपिया रोग, स्थुलता, ऑटिझम, विचार करण्याची आणि बोलण्याची क्षमता कमी होत आहे. मुले दिवसभर किती वेळ मोबाईल बघत आहेत किंवा कार्टून पाहत आहेत. याबद्दल तुम्ही सतर्क असणे खूप गरजेचे आहे.
लहान मुलांमध्ये ग्रीवा वेदना (गर्भाशय समस्या)
मोबाईलचा अतिवापर गर्भाशय ग्रीवाचे दुखणे हे एक कारण बनू शकते. यापूर्वी साधारणत: पन्नशीतील लोकांमध्ये गर्भाशयाच्या वेदनेची समस्या दिसून येत होती, परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण आणि लहान मुलांमध्येही अशा समस्या दिसून येत आहे. लहान मुलांमध्ये मोबाईलच्या व्यसनामुळे नेहमी थकवा जाणवणे, डोके, पाठदुखी, चालताना पाय लडखडणे, मणक्यात वेदना, मन:स्थिती, चिडचिड व आक्रमक वर्तन आदी लक्षणे दिसू लागल्याने गर्भाशयाच्या समस्या उद्भवत असल्याचे तज्ञांनी सांगितले.
एकाच स्थितीत बसणे
मोबाईल वापरताना मुले बसण्याच्या स्थितीकडे लक्ष देत नाहीत. तासन्तास एकाच स्थितीत बसतात. अशा स्थितीमुळे पाठीच्या कण्यावर दबाव येतो. यामुळे लिगामेंट स्प्रेनचा (गुडघ्यांच्या समस्या) धोका वाढतो. अशा परिस्थितीत, स्नायू कडक होऊन डिस्कची समस्या उद्भवू शकते. यामुळे मुलांमध्ये स्थूलताही वाढत आहे.
मोबईलवरून बोलताना 1.6 वॅट मायक्रोवेव्ह टेक्नॉलाजी, रेडीओ फ्रेक्वेन्सी वापरली जातात. या लहरी कानातून थेट मेंदूपर्यंत पोहचतात. यामुळे कान गरम होतात. डोळे कोरडे पडतात. पुर्वी 12 ते 15 मायनस असा नंबर असायचा. आता याच्यात दुपटीने वाढ झाली असुन 31 ते 32 मायनस असा चष्म्याचा नंबर झाला आहे.
असा ठेवा स्क्रीन टाईम
-6 ते 20 वर्षे : जास्तीत जास्त 1 तास
-20 वर्षाच्यापुढे : जास्तीत जस्त 2 तास
-मोबाईल कानाला लावून जास्त काळ बोलू नये.
-शक्यतो स्पिकर अथवा ब्लॅट्रुथचा वापर करा.
-मुलांजवळ जास्त काळ मोबाईल राहणार नाही याची दक्षता घ्या.
-हेडफोनचा वापर टाळा
-झोपताना मोबाईल दुर ठेवा
-वाहन चलविताना मोबाईलचा वापर टाळा.
मेंदूवर ताण वाढल्याने विविध आजारांना आमंत्रण
साधारणत: मेंदू हा शरिरावर नियंत्रण ठेवत असतो. मोबाईलच्या अतिवापराने झोप कमी होत असल्याने मेंदूवर ताण पडत आहे. यामुळे माणसिक संतुलन बिघडणे, हृदयरोग, रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढणे, आदी मेंदूशी निगडीत आजारांना सामोरे जावे लागत आहे.
डॉ. अक्षय बाफना हृदयविभाग प्रमुख, सीपीआर हॉस्पिटल