मिठाच्या अत्याधिक सेवनामुळे आरोग्याला धोका
राज्यसभेत आरोग्यमंत्री नड्डा चे प्रतिपादन : लोकांमध्ये जागरुकता वाढविण्याचे कार्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय चिकित्सा संशोधन परिषदेला (आयसीएमआर) अत्याधिक मिठाचे सेवन देशात उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या वाढत्या रुग्णसंख्येला आणखी वाढवत असल्याचे आढळून आले आहे. अत्याधिक मीठ सेवनाच्या धोक्यांविषयी सरकार जागरुकता फैलावत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले आहे.
सरकार, भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या माध्यमातून आरोग्यदायी आहाराच्या सवयींना चालना देणे आणि अत्याधिक मिठाच्या सेवनाच्या हानिकारक प्रभावांविषयी जागरुकता फैलावण्यासाठी ‘ईट राइट इंडिया’ अभियान चालवत असल्याचे न•ा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे.
मर्यादित सेवनाचा सल्ला
या अभियानाच्या अंतर्गत प्रमुख कार्यक्रमांमध्ये जनसंचार माध्यम आणि सोशल मीडिया कॅम्पेन ज्यात ‘आज से थोडा कम’ सामील आहे. याचा उद्देश दैनंदिन आहारात मीठ, साखर आणि मैद्याचे प्रमाण हळूहळू कमी करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ‘ईट राइट टूलकिट’चा विकास आणि प्रसार करणे आहे, जेणेकरून लोकांना उच्च प्रमाणातील मीठ आणि साखरयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन मर्यादित करण्याविषयी सल्ला देता येईल असे नड्डा यांनी राज्यसभेत बोलताना म्हटले आहे.
सामान्य टेबल मिठाच्या वापरावर जोर
प्रभाव आणि सुरक्षेविषयी उपलब्ध पुराव्यांची समीक्षा आणि अतिरिक्त प्रासंगिक घटकांवर विचाराच्या आधारावर जागतिक आरोग्य संघटनेने सोडियमचे सेवन प्रतिदिन 2 ग्रॅमपेक्षा कमी करण्याची शिफारस केली आहे. या संदर्भात कमी प्रमाणात सामान्य टेबल मिठाचा वापर करणे सोडियमचे प्रमाण कमी करण्याच्या समग्र रणनीतिचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. जर तुम्ही टेबल सॉल्टचा वापर कू इच्छित असाल तर जागतिक आरोग्य संघटना नियमित टेबल सॉल्टला कमी सोडियमयुक्त पोटॅशियमयुक्त पर्यायांनी बदलण्याची सूचना करते. ही शिफारस सामान्य लोकसंख्येतील प्रौढांसाठी (गरोदर महिला किंवा मुलांसाठी नाही) आहे, ज्यात किडनीचे आजार असलेले व्यक्ती किंवा पोटॅशियम उत्सर्जनाला प्रभावित करू शकणाऱ्या अन्य स्थिती सामील नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट पेले आहे.