For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पँगोंग सरोवरानजीक पीएलएकडून ‘खोदकाम’

06:20 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
पँगोंग सरोवरानजीक पीएलएकडून ‘खोदकाम’
Advertisement

अमेरिकन उपग्रहीय छायाचित्रांद्वारे दावा : बंकर निर्मिती होत असल्याचा संशय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीनची कुटिल हेतू पुन्हा एकदा समोर आला आहे. चीनने पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये खोदकाम सुरू केल्याचा दावा आहे. उपग्रहाच्या मदतीने जगातील प्रमुख भौगोलिक भागांवर नजर ठेवणारी संस्था ब्लॅकस्कायकडून जारी काही छायाचित्रांच्या विश्लेषणातून चीन पूर्व लडाखमध्ये पँगोंग सरोवरानजीक खोदकाम करत असल्याचे समोर आले आहे. या छायाचित्रांनुसार 2021-22 मध्ये चिनी सैनिकांनी याच भागात सैन्यतळ निर्माण केला होता. येथे काही भूमिगत बंकरही निर्माण करण्यात आले असून त्यांचा वापर इंधन, शस्त्रास्त्रs आणि सैन्य रसद सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. उपग्रहाच्या मदतीने काढण्यात आलेल्या छायाचित्रांचा दाखला देत ब्लॅकस्कायच्या विश्लेषकांनी चीनचे सैन्य पूर्व लडाखमध्ये पँगोंग सरोवराच्या आसपास दीर्घ कालावधीसाठी खोदकाम करत असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

पँगोंग सरोरवराच्या उत्तर काठानजीक सिरजापमध्ये चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीच सैन्यतळ आहे. सरोवराच्या आसपास तैनात करण्यात येणाऱ्या चिनी सैनिकांचे मुख्यालय देखील याच क्षेत्रात आहे. हे स्थान अधिक संवेदनशील आहे, कारण चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून केवळ 5 किलोमीटर अंतरावर सैन्यतळ निर्माण केला आहे. या भूभागावर भारताचा दावा आहे, परंतु चीन स्वत:ची मनमानी तेथे करू पाहत आहे. मे 2020 मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव सुरू होण्यापूर्वी हा भाग पूर्णपणे रिकामी होता आणि या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे खोदकाम किंवा निर्मितीकार्य सुरू करण्यात आले नव्हते.

युएस आधारित संस्था ब्लॅकस्कायकडून 30 मे रोजी टिपण्यात आलेल्या छायाचित्रांद्वारे 6 उतारयुक्त प्रवेशद्वार स्पष्टपणे दिसून येत आहेत. या मोठ्या बंकरनजीक 5 प्रवेशद्वार असलेले आणखी एक छोटा बंकर देखील आहे. ब्लॅकस्कायच्या एका विश्लेषकाने सैन्यतळावर चिलखती वाहने उभी करण्याचे ठिकाण, परीक्षण रेंज, इंधन आणि युद्धसामग्री साठविणाऱ्या भवनांचा विस्तार करण्यात आला आहे. हा तळ गलवान खोऱ्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे.

भुयार निर्मिती हाच पर्याय

ब्लॅकस्कायच्या छायाचित्रांवर भारतीय अधिकाऱ्यांकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पँगोंग सरोवराच्या आसपासच्या क्षेत्रात सेवा बजावलेल्या एका माजी सैन्याधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर यासंबंधी वक्तव्य केले आहे. आजच्या युद्धक्षेत्रात उपग्रह किंवा हवाई देखरेख प्लॅटफॉर्म्सचा वापर करत प्रत्येक कृतीचा थांगपत्ता लावला जाऊ शकतो. आमच्या बाजूने अशाप्रकारचे कुठलेच भूमिगत केंद्र नाही. उत्तम सुरक्षा राखण्यासाठी भुयार निर्मिती हाच एकमेव पर्याय आहे. चिनी सैन्य भुयारनिर्मितीच्या कार्यांमध्ये अग्रगण्य आहे. या संरचनांसाठी कुठल्याही प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता नसते, केवळ सिव्हिल इंजिनियरिंग कौशल्य आणि निधी पुरेसा आहे. अन्यथा आम्हाला हवाई सुरक्षा उपकरणांमध्ये आणखी गुंतवणूक करावी लागणार असल्याचे या माजी सैन्याधिकाऱ्याने म्हटले आहे.

2020 पासून तणाव

भारताने 2020 मध्ये चीनसोबत तणाव सुरू झाल्यापासून सैन्य आणि रसद सहाय्यासाठी स्वत:च्या सीमावर्ती भागांमध्ये विविध रस्ते, पूल, भुयारी मार्ग आणि हवाई क्षेत्र आणि हेलिपॅडची निर्मिती केली आहे. सैन्यमोहिमांना सुलभ करण्यासाठी वाढता खर्च आणि रणनीतिक प्रकल्पांमुळे सीमावर्ती क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या उभारणीला बळ मिळाले आहे. 2023-24 दरम्यान बीआरआने 3,611 कोटी रुपयांच्या निधीतून 125 पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले असून यात अरुणाचल प्रदेशमध्ये निर्मित सेला भुयारीमार्ग देखील सामील आहे.

Advertisement
Tags :

.