For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बारावी विद्यार्थ्यांची शुक्रवारपासून परीक्षा

11:00 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
बारावी विद्यार्थ्यांची शुक्रवारपासून परीक्षा
Advertisement

सीसीटीव्ही, फ्लाईंग स्क्वॉडसह पोलीस बंदोबस्त

Advertisement

बेळगाव : बारावी अंतिम परीक्षेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून शुक्रवार दि. 1 मार्चपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. बारावीच्या गुणांवरच उच्चशिक्षण अवलंबून असल्याने विद्याथ्यर्किंडून जोरदार तयारी सुरू आहे. यावर्षी 42 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाने कंबर कसली असून परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावर्षी राज्यात 1 मार्च ते 22 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थी पदवीपूर्व द्वितीय वर्षाची परीक्षा देणार आहेत. यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 23 हजार 562 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी प्रत्येक परीक्षा केंद्राला स्वतंत्र निरीक्षक नेमण्यात आला असून परीक्षा केंद्रावर कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

42 केंद्रांवर होणार परीक्षा

Advertisement

विद्याथ्यर्चीं संख्या वाढत असल्याने परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली जात आहे. यावर्षी शहरात 21, खानापूर 3, रामदुर्ग 5, सौंदत्ती 3, बैलहोंगल 7, कित्तूर येथील 3 केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी फ्लाइर्गिं स्क्वॉड नेमण्यात आले आहेत. तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

निरीक्षक-केंद्र प्रमुखांची आज बैठक

शुक्रवार दि. 1 मार्चपासून बारावीच्या अंतिम परीक्षांना प्रारंभ होत आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही, फ्लाइर्गिं स्क्वॉड, निरीक्षक यांची नेमणूक करण्यात येणार आहे. मंगळवारी शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व निरीक्षक व केंद्र प्रमुखांची बैठक होणार असून त्यामध्ये योग्य त्या सूचना केल्या जाणार आहेत.

- एम. एम. कांबळे (पदवीपूर्व जिल्हाशिक्षणाधिकारी)

Advertisement
Tags :

.