19 वर्षांपर्यंत फरार माजी सैनिक जेरबंद
वृत्तसंस्था/ कोची
दोन माजी सैनिकांनी एक युवती आणि 17 दिवसांच्या जुळ्या मुलींची हत्या केली होती. या हत्येनंतर दोन्ही माजी सैनिक 19 वर्षांपर्यंत फरार राहिले. याप्रकरणी प्रथम तपास पोलिसांनी केला होता, मग सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला होता. या दोघांचा शोध लागला नव्हता. परंतु अचानक सीबीआयला एक टिप मिळाली. यानुसार दोघेही ओळख बदलून पु•gचेरीत राहत होते. या दोघांना आता अटक करण्यात आली आहे.
केरळच्या कोल्लम जिल्ह्dयात राहणारी 24 वर्षीय युवती रंजिनीचे नजीकच्या अंचल गावचा रहिवासी दिबिल कुमारवर प्रेम जडले होते. दिबिल कुमार हा सैन्यात होता आणि पठाणकोटमध्ये तैनात होता. दोघांदरम्यान झालेल्या शारीरिक जवळीकीतून रंजिनीने 2006 मध्ये जुळया मुलींना जन्म दिला होता. यानंतर दिबिलने रजनीपासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. यामुळे रंजिनीच्या आईने केरळ राज्य महिला आयोगात धाव घेतली होती.
महिला आयोगाने पॅटर्निटी टेस्टचा आदेश दिला होता. यामुळे संतापलेल्या दिबिलने रंजिनीच्या हत्येचा कट रचला. दिबिलचा मित्र राजेशही सैन्यात होता. तो देखील रजनी आणि तिच्या आईला ओळखत होता. दिबिलला रंजिनीसोबत विवाह करण्यासाठी समजावेन असे त्याने सांगितले होते. परंतु तो देखील दिबिलच्या कटात सामील झाला होता. 10 फेब्रुवारी 2006 रोजी दोघांनी मिळून रंजिनी आणि त्याच्या दोन्ही मुलींची हत्या केली होती.
सीबीआयकडे तपास
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले होते. सीबीआयला दिबिल आणि राजेश हे दोघेही नाव बदलून पु•gचेरीत राहत असल्याचे कळले. दोघांनी आधारकार्ड समवेत अनेक बनावट दस्तेएवज तयार करवून घेतले होते. तसेच दोन शिक्षिकांसोबत विवाह केला होता. त्यासंबंधी माहिती मिळाल्यावर सीबीआयने दोघांनाही ताब्यात घेतले.
हत्येनंतर दोघेही फरार
रंजिनीची आई मुलींचे जन्मप्रमाणपत्र मिळविण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेली असताना या हत्या झाल्या होत्या. हत्येनंतर दिबिल व राजेश फरार झाले होते. मार्च 2006 मध्ये सैन्याने दोघांना फरार घोषित केले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु यात त्यांना यश आले नव्हते.