For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी सैनिक दत्ताराम पास्ते यांचे निधन

05:48 PM Jan 11, 2026 IST | अनुजा कुडतरकर
माजी सैनिक दत्ताराम पास्ते यांचे निधन
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी
कलंबिस्त येथील माजी सैनिक दत्ताराम नारायण पास्ते (८५) यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. भारतीय लष्करात सेवा करुन निवृत्तीनंतर त्यांनी मुंबईत काही वर्षे सरकारी नोकरी केली होती. रविवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन, जावई, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. सैनिक नागरी पतसंस्थेचे माणगाव शाखाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश उर्फ बाळू पास्ते यांचे ते वडील होत तर वसोली येथील प्रकाश परब, गोठोस येथील मंगेश डीगे आणि ओटवणे येथील मिलिंद गावकर यांचे ते सासरे होत.

Advertisement

Advertisement
Tags :

.