महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर प्रदेशात माजी मंत्र्याला 3 वर्षांची शिक्षा

06:22 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिक्षेसह 10 लाख दंड : खासदार-आमदार न्यायालयाचा निर्णय

Advertisement

► वृत्तसंस्था/ प्रयागराज

Advertisement

उत्तर प्रदेशचे माजी शिक्षणमंत्री राकेश धर त्रिपाठी यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असून त्यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खासदार-आमदार न्यायालयाचे विशेष न्यायाधीश डॉ. दिनेश चंद्र शुक्ला यांनी राकेश धर त्रिपाठी यांना शिक्षा सुनावली आहे. याशिवाय 10 लाखांचा दंड भरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

माजी शिक्षणमंत्री राकेश धर त्रिपाठी यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. याप्रकरणी विशेष खासदार-आमदार न्यायालयाने शुक्रवारी निकाल देताना माजी मंत्र्याला ताब्यात घेऊन तुऊंगात पाठवण्याचे निर्देशही दिले आहेत. सरकारी व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकालासाठी 22 डिसेंबरची तारीख निश्चित केली होती.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरलेले राकेश धर त्रिपाठी यांनी 1 मे 2007 ते 31 डिसेंबर 2011 दरम्यान उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्रिपद भूषवले होते. त्यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याचा आरोप होता. या प्रकरणाची सुनावणी खासदार-आमदार विशेष न्यायालयात सुरू होती. न्यायालयाने त्यांना दोषी घोषित करत शिक्षा घोषित करण्यासाठी 22 डिसेंबर 2023 ही तारीख निश्चित केली होती. त्यांच्याकडून मालमत्तेबाबत खुलासा मागितला असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी

माजी मंत्री राकेश धर त्रिपाठी यांच्यावर भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. इन्स्पेक्टर रामसुख राम यांनी 23 नोव्हेंबर 2012 रोजी प्रयागराजमधील मुथीगंज पोलीस ठाण्यात राकेश त्रिपाठींविऊद्ध गुन्हा दाखल केला होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर तपास दक्षता विभागाकडे सोपवण्यात आला. तपासानंतर वाराणसी जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर हे प्रकरण खासदार-आमदाराच्या विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article