माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला करायचयं मराठीत काम
मुंबई
स्काय फोर्स हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर चांगली जादू करत आहे. या सिनेमा अक्षय कुमार सोबत वीर पहाडीयाने इंडिय एअर फोर्स ऑफीसरची भूमिका साकारली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडिया याने या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. सिनेमातील या भूमिकेसाठी वीर ने खूपच मेहनत घेतली आहे. त्याने त्याचा लूक बदलण्यापासून ते चालणं, बोलणं, डायलॉग डिलिव्हरी पर्यंत खूप परिश्रम घेतले आहेत. वीरच्या या सिनेमातील भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान वीर ने एका मुलाखतीत सांगितेल की त्याला मराठीमध्ये काम करायचे आहे. मी चित्रपटातील सर्व विभागांमध्ये काम करुन त्याचा अनुभव घेतला आहे. त्याने भेडिया चित्रपटात वरुण धवनचा बॉडी डबल म्हणूनही काम केले आहे. अभिनेता बनण्याचे त्याचे लहानपणीपासूनचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने अनेक ऑड़ीशन्स दिल्या आहेत. त्यानंतर अखेर त्याला अक्षय कुमार सोबत स्काय फोर्स या सिनेमातील भूमिका मिळाली, असे त्याने या मुलाखती दरम्यान सांगितले.
पुढे वीर म्हणाले, माझी आई मराठी आहे. माझ्यावर मराठी संस्कार झाले आहेत. माझी मूळ अजूनही मराठीत आहेत. मला महाराष्ट्राचे नाव देशातच नाही तर जगात उज्ज्व करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहे असेही वीर ने सांगितले.