महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विकसित भारत संकल्प यात्रा गोव्याला सक्षम बनविणार

12:42 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रोहन खंवटे : सुकूर, पेन्ह द फ्रान्क पंचायत येथे संकल्प मोहीम

Advertisement

पणजी : विकसित भारत संकल्प यात्रा गोवा राज्याला सक्षम बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याच उद्दीष्ट्यापूर्तीसाठी ही संकल्प यात्रा मोहीम राज्यात सुरू झाली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम गुऊवारी सुकूर व पेन्ह द फ्रान्क पंचायत क्षेत्रात घेण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री खंवटे बोलत होते. यावेळी दोन्ही पंचायतीचे सरपंच, उपसरपंच व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री खंवटे म्हणाले, भारत सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा लाभ लोकांना मिळावा यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 15 नोव्हेंबर रोजी यात्रेची सुरूवात केली होती. या संकल्प यात्रेत एकूण 17 प्रमुख ग्रामीण जनजागृती कार्यक्रम आहेत.

Advertisement

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाळ अंत्योदय योजन। राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, प्रधानमंत्री  आवास योजना (ग्रामीण), प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रधानमंत्री किसान सन्मान आदी योजनांची माहिती देण्यासाठी ही संकल्प मोहीम काढल्याचेही मंत्री खंवटे यांनी सांगितले. भारत सरकारद्वारे राबविण्यात येण्राया विविध योजनांचा लाभ लोकांना मिळावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे खंवटे यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 15 नोव्हेंबर रोजी पर्वरी येथील सचिवालयातून विकसित भारत मोहिमेची सुऊवात केली. आदिवासी मंत्रालय, कृषी मंत्रालय आणि माहिती व प्रसिद्धी मंत्रालय या सर्वांनी मिळून उत्तर गोवा जिह्यासाठी दोन ग्रामीण व्हॅन आणि दक्षिण गोवा जिह्यासाठी एक आदिवासी व्हॅन तीन व्हॅनसह गोवा राज्याला पुरवठा करण्यासाठी काम केले. शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांसह दररोज, या व्हॅन गोव्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देतात, ज्यामध्ये उत्तर गोवा जिह्यातील 04 ग्रामपंचायती आणि दक्षिण गोवा जिह्यातील 02 ग्रामपंचायतींचा समावेश होतो.

दिव्यांग मुलांना मिळणार रोबोटिक किट

भारत सरकारने शेतीमध्ये कृषी-ड्रोन्स वापरण्याकरता महिलांना सक्षम करण्यासाठी खते आणि कीटकनाशके फवारणी, शारीरिक श्रम कमी करण्यासाठी, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी, ड्रोन तंत्रज्ञान देखील सादर केले आहे. या व्यतिरिक्त, वेगवेगळ्या दिव्यांग मुलांना रोबोटिक किट प्रदान करून, त्यांना या वर्षीच्या जानेवारीमध्ये होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स महोत्सवात शिकण्याची आणि सहभागी होण्यासाठी एक उत्कृष्ट उपक्रम हाती घेण्यात येत आहे, असे माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article