विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम वाफोलीत संपन्न
प्रतिनिधी
बांदा
समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत.त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.या यात्रेच्या माध्यमातून नागरीकांना विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना याबाबत विस्ताराने सुचना दिल्या.
केंद्र शासनाच्या अनेक फ्लॅगशिप योजनांपासून अजूनही काही लाभार्थी वंचित आहेत.या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी संपुर्ण देशभर हा यात्रेचा उपक्रम राबविली जात आहे. समाजातील सर्वच घटकातील वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी राबविण्यात येत असलेली ही मोहिम गावागावात प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना उपक्रम काळात लाभ देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न आहे.
यात्रेचा जनजागृती रथ आज वाफोली गावामध्ये आला असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून आपल्या योजना गावकऱ्यांना समजावून सांगितल्या आहेत.यासाठी ग्राम स्तरावर काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केले.यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, उपसरपंच विनेश गवस,ग्रा.सदस्य साक्षी शिरोडकर,मंजुळा शेगडे,गौरी गवस,पोलीस पाटील आना गवस,माजी सरपंच मारुती गवस,बबन गवस,कृषी सहाय्यक सौ. वसकर,आरोग्य सेविका मोरे, आशा सेविका ज्योती सावंत,. ऋतुजा गवस,ग्रामपंचायत कर्मचारी संदीप धुरी,लवू कांबळे,ग्रामसेवक प्रसाद ठाकूर यांनी सुयोग्य नियोजन करून कार्यक्रम तसेच आदरणीय पंतप्रधान महोदय यांचा संवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. आज वाफोली येथे विकसित भारत संकल्प यात्रा च्या अनुषंगाने गट विकास अधिकारी सावंतवाडी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रत्येक पात्र लाभार्थ्यांस या उपक्रम कालावधीत विविध केंद्र शासनासह राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी वाफोली सरपंच उमेश शिरोडकर व उपसरपंच विनेश गवस प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी द्रोणच्या सहाय्याने पिकांवर औषध फवारणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमात वाफोली येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती