For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सगळीकडे एकच चर्चा.. किती धावा करणार वैभव बच्चा..

06:53 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सगळीकडे एकच चर्चा   किती धावा करणार वैभव बच्चा
Advertisement

साबरमती नदीकिनारी जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमव उद्या राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आयपीएल स्पर्धेत एकमेकांना भिडणार आहेत.

Advertisement

गुजरातकडे शुभमन गिल, जोस बटलर, फिलिप, रशीद खान असे खेळाडू आहेत. तर राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, रियान पराग हे दोन हात करतील. तरी पण इथे चर्चा आहे ती फक्त आणि फक्त राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीची...

आज सरावासाठी दोन्ही संघांच्या बसेस सायंकाळी स्टेडियममध्ये आल्या त्यावेळी गेट्स आणि आजूबाजूच्या परिसरात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी मी अनेकांशी प्रत्यक्ष बोललो. एकूणच माहोल असा दिसला की प्रत्येकाला वैभवची फलंदाजी बघायची आहे. त्यांची अपेक्षा अशी आहे की त्याने या सामन्यात फटकेबाजी करून किमान अर्धशतक झळकवावे...

Advertisement

हे दोन संघ आयपीएल स्पर्धेत आजमितीस 8 वेळा भिडले असून गुजरात 6 विजय आणि राजस्थान 2 विजय अशी स्थिती आहे. गुजरातने 217 ही उच्चतम आणि 177 ही न्यूनतम धावसंख्या उभारली तर, राजस्थानची आकडेवारी 212 आणि 118 अशी आहे.

सायंकाळी 6 च्या सुमारास दोन्ही संघ सरावासाठी मैदानात उतरले. प्रेक्षकांनी यावेळी देखील गर्दी केल्याचे दिसले.

तत्पूर्वी, गुजरातचा साहाय्यक प्रशिक्षक आशिष कपूरने क्रीडा समीक्षकांशी संवाद साधला. तो म्हणाला, संघाचा खेळ अद्याप अपेक्षेप्रमाणे होत नाहीये पण आम्ही सुधारणा करू. जोस बटलर खराब फॉर्ममधून निश्चित बाहेर येईल.

राजस्थानचा फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड वैभव सूर्यवंशीबाबत कौतुकाने बोलला. तो म्हणाला, वैभव मेहनत घेतोय आणि खेळावर लक्ष केंद्रित करून त्याची जोरदार वाटचाल सुरू आहे.

Advertisement
Tags :

.