न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी आकाश दीपच्या तंदुरुस्तीकडे सर्वांचे
वृत्तसंस्था, श्रीनगर
पाठीच्या खालच्या भागातील स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे सात महिने मैदानापासून दूर राहिलेला प्रतिभावान वेगवान गोलंदाज आकाश दीप, गुरुवारी सुरू होणाऱ्या इगराणी चषकाच्या सामन्यात रेस्ट ऑफ इंडिया संघाकडून पूर्ण क्षमतेने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
आकाश दीपने यापूर्वी फेब्रुवारीमध्ये रणजी करंकड स्पर्धेची उपांत्य फेरी खेळली होती. सात महिन्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेनंतर त्याला आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्याची आणि गोलंदाजीचा लय पुन्हा मिळवण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यासाठी राष्ट्रीय निवड समितीचे किमान दोन सदस्य उपस्थित असतील. आणि ते आकाशवर बारीक लक्ष ठेवतील. जसप्रित बुमराहृ मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांच्यासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या कसोटी संघातील पाचवा वेगवान गोलंदाज म्हणून आकाशच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. निसर्गरम्य शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ (ज्यात अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्स्ट कामगिरी करणारे खेळाडू आहेत) यजमान संघाशी भिडेल. यजमान संघाला मात्र त्याचा मुख्य गोलंदाज आकिब नबी याची उणीव भासेल. कारण तो सध्या राष्ट्रीय कर्तव्यावर आहे.
श्रीनगरमध्ये बऱ्याच काळापासून बीसीसीआयचा इतक्या मोठ्या दर्जाचा सामना झालेला नाही. शिवाय, सामन्य जनतेसाठी प्रवेश विनामूल्य असल्याने, रणजी करंडक विजेत्या संघाला मिळणाऱ्या पाठिंब्यात कोणतीही कमतरता भासणार नाही. 1980 आणि 1990 च्या दशकात, इराणी चषक हा भारतीय संघात स्थान मिळवण्यास इच्छुक असलेल्या खेळाडूंसाठी एक चाचणी सामना मानला जात असे. रेस्ट ऑफ इंडिया संघात स्थान मिळवणे म्हणजे तो खेळाडू राष्ट्रीय संघाच्या दारावर एकप्रकारे दस्तक देत आहे, असे मानले जाई. आता ते दिवस राहिले नाहीत आणि बीसीसीआयच्या व्यस्त वेळापत्रकातील इराण्टी चषक हा केवळ आणखी एक सामना बनला आहे. याचे कारण म्हणजे एक राष्ट्रीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत टी-20 क्रिकेट खेळत आहे. तर दुसरा वरिष्ठ संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवशीय मालिकेत व्यस्त आहे. मुख्य संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या खेळाडूंची पुढची फळी सध्या पुद्दुचेरी येथे ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या कसोटी सामन्यात व्यस्त आहे. त्यामुळे इगराणी चषक स्पर्धा प्रामुख्याने ऋषभ पंतसारख्या खेळाडूंना सरावासाठी आणि सामन्याचा अनुभव घेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. तसेच फिरकी गोलंदाजीतील नवा उदयोन्मुख खेळाडू मानव सुथार याच्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळवण्याची ही एक संधी असेल.
राष्ट्रीय व्हाईट बॉल संघातून वगळलयगामुळे पंत आता केवळ एकाच प्रकारच्या कसोटी क्रिकेटचा खेळाडू बनला आहे. मात्र इराणी चषक आणि त्यानंतर न्यूजीलंडमधीला इंडिया अ चे सामने त्याला नोव्हेंबरच्या मध्यावर होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी लयीत राहण्यास नक्कीच मदत करतील. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू सरफराज खानही यात सहभागी असेल. या भागाचा जावई असल्याने तो स्थानिक प्रेक्षकांचा लाडका खेळाडू ठरेल. संघचा उपकर्णधार म्हणून सरफराज दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. जरी ही कामगिरी त्याला थेट कसोटी संघात स्थान मिळवून देण्यास पुरेशी ठरली नाही तरीही वरिष्ठ संघाच्या दौऱ्यापूर्वी होणाऱ्या इंडिया अ च्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी तो नक्कीच शर्यतीत राहील.
रेस्ट ऑफ इंडिया संघातील अनेक खेळाडूंसाठी इराणी चषक हा मुख्य संघाऐवजी इंडिया अ संघात स्थान मिळवण्याचा सामनटा आहे. कारण मुख्य संघातील 90 टक्के खेळाडूंच्टी निवड आधीच निश्चित झाली आहे. सनत सांगवान, आयुष दोसेजा, अनुकूल रॉय आणि सारांश जैन या सारख्या खेळाडूंचे हेच उद्दिष्ट असेल. जम्मू काश्मीरसाठी, इराणी चषक हा सामना हे सिद्ध करण्याची संधी आहे की, नबी व्यतिरिक्त आणखीही काही प्रतिभावान खेळाडू राष्ट्रीय संघात प्रवेश करण्यास सज्ज आहेत. आपला 25 वा प्रथमश्रेणी हंगाम खेळणाऱ्या कर्णधार पारस डोग्रासाठी मात्र, खेळावरील प्रेमापोटी मैदानात उतरणे हीच मुख्य बाब आहे.
संघ: रेस्ट ऑफ इंडिया : कर्णधार ऋषभ पंत, आर्यन जुयाल, सनत सांगवान, आर. स्मरण, आयुष दोसेजा, सरफराज खान, शिखर मोहन, सुदीप कुमार घरामी, सारांश जैन, अनुकुल रॉय, आकाश दीप, आर्यन पांडे, मानव सुथार, मुकेश कुमार, मुकेश चौधरी
जम्मू काश्मीर: पारस डोगरा (कर्णधार), कमरान इक्बाल, शुभम खजुरिया, यावर हसन, शुभम पुंडीर, कन्हैया वाधवन, आबिद मुश्ताक, कवलप्रीत सिंग, सुनील कुमार, उमर नझीर, साहिल लोत्रा, वंशज शर्मा, नासिर लोन, रोहित शर्मा.