For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशातील सगळ्या राज्यातील नागरीकांना समान दर्जा मिळावा : राहुल गांधी

06:40 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशातील सगळ्या राज्यातील नागरीकांना समान दर्जा मिळावा   राहुल गांधी
Advertisement

भारत जोडो न्याय यात्रा नागालँडमध्ये

Advertisement

वृत्तसंस्था/ कोहिमा

भारत जोडो न्याय यात्रेच्या तिसऱ्या दिवशी (मंगळवारी) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नागालँडच्या विश्वेमा गावातून यात्रेस प्रारंभ केला. येथे राहुल गांधी यांनी लोकांना संबोधित केले आहे. नागालँड छोटे राज्य असले तरीही देशाच्या उर्वरित लोकांप्रमाणे येथील लोकांना समान दर्जा मिळावा असे उद्गार राहुल यांनी काढले आहेत.

Advertisement

राहुल यांनी कोहिमा येथे दुसऱ्या महायुद्धाच्या स्मारकाला भेट देत पुष्पांजली अर्पण केली आहे. तसेच येथील हायस्कूल जंक्शनमध्ये त्यांनी सभेला संबोधित केले आहे. राहुल यांची यात्रा नागालँडमधील कोहिमा, त्सेमिन्यू, वोखा, जुन्हेबोटो आणि मोकोककुचुंग येथून जाणार असून तेथे ते रॅली घेणार आहेत.

राहुल यांनी सोमवारी इंफाळ पश्चिमच्या सेकमई येथून यात्रा सुरू केली होती. राहुल यांनी यावेळी पारंपरिक मणिपुरी जॅकेट परिधान केले होते. लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी राहुल हे अनेकदा बसमधून खाली उतरले होते. यावेळी लोकांसोबत त्यांनी सेल्फी घेतली आणि पारंपरिक नृत्यप्रदर्शन पाहिले आहे.

राहुल गांधी यांची यात्रा मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायांच्या भागातून गेली आहे. राहुल गांधी यांनी कांगपोकपी जिल्ह्याचीही यात्रा केली असून येथे मागील वर्षी मे महिन्यात दोन महिलांवर सामूहिक अत्याचार झाले होते.

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी 14 जानेवारी रोजी थौबल येथून स्वत:च्या भारत जोडो न्याय यात्रेचा शुभारंभ केला होता. निवडणुकीला फारसा कालावधी शिल्लक राहिलेला नाही, याचमुळे पायी यात्रेसोबत बसमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. मणिपूरमध्ये भाजपने द्वेषाचे राजकारण केले आहे. मणिपूरमध्ये अनेक जण स्वकीयांसमोर मारले गेले आहेत, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आजवर मणिपूरमध्ये या लोकांचे अश्रू पुसण्यासाठी पोहोचले नाहीत अशी टीका राहुल गांधी यांनी थौबल येथे बोलताना केली होती.

Advertisement
Tags :

.