महासत्ता उभारण्यात प्रत्येकाने योगदान द्यावे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन: जुने गोवेत राज्यस्तरीय गांधी-शास्त्री जयंती साजरी
वार्ताहर जुने/गोवे
भारत देशाला 2047 पर्यंत महासत्ता बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक देशवासियाने हातभार लावला पाहिजे. मग तो लहान असो, तऊण असो वा ज्येष्ठ नागरिक असो. योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. जुने गोवे येथील गांधी चौकात राज्यस्तरीय गांधी जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कुंभारजुवे मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, जुने गोवेच्या सरपंच सौ. मेधा मेघश्याम पर्वतकर, माजी मंत्री तथा कुंभारजुवे मतदारसंघाच्या माजी आमदार सौ. निर्मला सावंत, माजी आमदार धर्मा चोडणकर, हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम धर्मगुऊ, सरकारी अधिकारी, आजी-माजी पंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले की स्वातंत्र्य आणि स्वच्छता हे गांधीजींचे ध्येय होते. त्यापैकी स्वातंत्र्य मिळाले. पण स्वातंत्र्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत हवी तेवढी प्रगती झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींचे हे ध्येय साकार करण्यासाठी 2014 साली देशात स्वच्छ भारत मोहीम राबवून सुरवात केली.
भाषण संपल्यावर मुख्यमंत्री विद्यार्थ्यांत मिसळले. त्यांच्याबरोबर बसून फोटो घेतले. यावेळी विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुऊवात झाली. यावेळी भगवद् गीता, कुराण, बायबल या धर्मग्रंथांचे वाचनही धर्मगुरुंनी केले. जुने गोवेच्या सरपंच सौ. मेधा मेघश्याम पर्वतकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुख्यमंत्री, कुंभारजुवेचे आमदार व इतर मान्यवरांनी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर ‘वैष्णव जन तो... हे गीत सादर करण्यात आले. प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
तद्नंतर मुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी जुने गोवे पंचायत सभागृहात लालबहादूर शास्त्राr यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार राजेश फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, सरपंच सौ. मेधा मेघश्याम पर्वतकर, पंच सदस्य सौ. सपना सदानंद भोमकर, उपसरपंच विश्वास कुट्टीकर, विनायक फडते, माजी आमदार धर्मा चोडणकर, माजी मंत्री सौ. निर्मला सावंत, माजी जि. पं. सदस्य नीलेश शिरोडकर व अन्य उपस्थित होते.