For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळायला हवा!

06:22 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रत्येक स्त्रीला सन्मान मिळायला हवा
Advertisement

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या वादग्रस्त पोस्टवर कंगनाचा पलटवार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी हिमाचलच्या मंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतसंबंधी केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार ‘शब्दयुद्ध’ सुरू आहे. श्रीनेत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा कंगनाने खरपूस समाचार घेतला असतानाच गुजरातमधील आणखी एका काँग्रेस नेत्याने त्यात उडी घेतल्याने शाब्दिक वाद भडकला. या प्रकरणाने जोर धरल्यानंतर सुप्रिया श्रीनेत यांच्या बाजूने आक्षेपार्ह ट्विट काढून टाकण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी स्पष्टीकरण देताना आपले ‘एक्स’ हँडल हॅक झाल्याचा दावा केला. आपण आक्षेपार्ह पोस्ट केलेली नाही अशी सारवासारव त्यांनी केली असली तरी ‘प्रत्येक महिला आदरास पात्र असून तिला सन्मान मिळायलाच हवा’ असा रोखठोक प्रतिटोला कंगना हिने लगावला आहे.

Advertisement

सुप्रिया श्रीनेत यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून कंगना राणावतचा फोटो पोस्ट करत ‘बाजारात किंमत काय आहे हे कोणी सांगू शकेल का?’ अशी टिप्पणी केली होती. ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कंगनाला मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अशा स्थितीत याबाबतचे राजकारणही तीव्र झाल्यानंतर कंगनानेही या अश्लील पोस्टवर जोरदार हल्ला चढवला आहे.

कंगना राणावतने आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये ‘प्रिय सुप्रिया जी, कलाकार म्हणून माझ्या गेल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिलांची भूमिका साकारली आहे. राणीमधील एका निष्पाप मुलीपासून ते धाकडमधील एका मोहक गुप्तहेरापर्यंत, मणिकर्णिकेतील देवीपासून चंद्रमुखीतील राक्षसापर्यंत. रज्जोमधील वेश्येपासून ते थलायवीमधील क्रांतिकारक नेत्यापर्यंत’ असे म्हटले आहे. हे दाखले देताना आपण आपल्या मुलींना पूर्वग्रहांच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे असे सांगत प्रत्येक स्त्री आपल्या सन्मानास पात्र आहे, असे कंगनाने ठणकावले आहे. तसेच तऊणाला तिकीट मिळाल्यास त्याच्या विचारधारेवर हल्ला होतो, तर तऊणीला तिकीट मिळाल्यावर तिच्या लैंगिकतेवर हल्ला होतो. हे विचित्र आहे. काँग्रेसचे नेते एका छोट्या शहराच्या नावाचा गैरवापर करत आहेत. महिलांबाबत असा वाईट लैंगिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या काँग्रेसवाल्यांना लाज वाटली पाहिजे, असेही कंगना पुढे म्हणाली.

Advertisement
Tags :

.