For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर काढणार

06:25 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर काढणार
Advertisement

हैदराबादमधील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्धार

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

भारतात बेकायदेशीरपणे घुसलेले स्थलांतरित हा विरोधी पक्षांच्या मतपेढीचा एक महत्त्वाचा भाग आहे. तथापि, भारतीय जनता पक्ष अशा प्रत्येक बेकायदा घुसखोराची हकालपट्टी करणार आहे. सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या विशेष मतदारसूची पुनर्सर्वेक्षणामुळे (एसआयआर) असे बेकायदा मतदार मतदारसूचीतून वगळले जात आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष एसआयआरला विरोध करत आहेत. असा विरोध करुन ते घुसखोरांची मते सुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.

Advertisement

ते तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे सोमवारी एका कार्यक्रमात भाषण करीत होते. हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ अभियानाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. देशभरात हा पक्ष हे अभियान चालवित असून अराजकतेविरोधात जनजागृती करण्यात येत आहे.

धास्तावलेले विरोधक

जाहीर सभेच्या आधी हैदराबाद येथे एका मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. ‘लोकशाही सुरक्षित करु, अराजकता नष्ट करु’ हे या मोर्चाचे घोषवाक्य होते. या मोर्चाला आणि त्याच्यानंतरच्या सभेला हैदराबादच्या जनतेचा मोठा प्रतिसाद लाभल्याचे वृत्त आहे. एसआयआरमुळे घुसखोरांची नावे मतदारसूचीतून नाहीशी होत आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या छातीत धडकी भरली आहे. घुसखोरांची नावे मतदारसूचीतून गेल्यास या पक्षांना निवडणुकीत फटका बसणार असल्याने ते धास्तावले आहेत. म्हणून त्यांनी एसआयआरला विरोध चालविला आहे. तथापि, निवडणूक आयोग ही प्रक्रिया पूर्ण करेल. एसआयआर किती आवश्यक आहे, हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

केंद्रीय निवडणूक आयोगाने साडेतेरा कोटी मतदारांची नावे वगळली, असा दिशाभूल करणारा आरोप विरोधक करीत आहेत. हा आरोप धादांत खोटा आहे, असे स्पष्ट करताना शाह यांनी आकडेवारी सादर केली. जवळपास साडेतेरा कोटी नावांपैकी अडीच कोटी मृत आहेत. एक कोटी डुप्लिकेट मतदार सापडले. साडेसहा कोटी नावे कायमचे स्थलांतरीत किंवा मागोवा घेता येत नाही अशी आहेत. तर 3 कोटी नावे बांगला देश आणि अन्य देशांमधून आलेल्या घुसखोरांची आहेत. हेच घुसखोर विरोधी पक्षांचे खात्रीचे मतदार आहेत. त्यांची बेकायदा मते वाचविण्यासाठी विरोधी पक्षांकडून गोंधळ माजविला जात आहे. तथापि, त्यांची डाळा शिजणार नाही, अशी माहिती अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात दिली आहे.

Advertisement
Tags :

.