कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गावातील प्रत्येक घर वेडेवाकडे

06:20 AM Apr 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनेक चित्रपटांमध्ये झळकले आहे गाव

Advertisement

तुम्ही अनोखे शहर आणि गावं पाहिली असतील, काही ठिकाणी खास प्रकारच्या वास्तू असतात, ज्या ऐतिहासिक असतील, तर काही ठिकाणी प्रेक्षणीय स्थळ असतात. परंतु जगाच्या एका कोपऱ्यातील एक गाव खूपच अनोखे आहे. हे गाव स्वत:च्या मध्ययुगाच्या काळाची आठवण करून देतो, परंतु यानंतर सर्वात खास बाब म्हणजे या गावातील घरांचे अनोखे डिझाइन आहे.  येथील जवळपास प्रत्येक घराचे डिझाइन हटके आहे. घरांचा काही हिस्सा वेडावाकडा असल्याने प्रत्येक घर कुठल्या ना कुठल्या प्रकारे अजबच दिसते.

Advertisement

अत्यंत सुंदर गाव

हे गाव युक्रेच्या सफोल्क प्रांतात लेवनहॅम नावाने प्रसिद्ध आहे. हे कधीकाळी इंग्लंडचे सर्वात आधुनिक मध्ययुगीन गाव मानले जायचे. परंतु आता हे केवळ स्वत:च्या अनोख्या वास्तू डिझाइनयुक्त घरांसाठी नव्हे तर येथील नैसर्गिक दृश्यांसाठी देखील ओळखले जाते. एखाद्या परीकथेतील गावात पोहोचल्याचा भास येथे आल्यावर होत असतो.

या गावात अनोख्या घरांसोबत काही प्रेक्षणीय इमारती देखील आहेत. तर काही घरं ही स्वत:च्या अनोख्या वैशिष्ट्यांसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहेत. येथे सर्वाधिक पाहिली जाणारी इमारत प्रसिद्ध कॉर्पस क्रिस्टीचा गिल्डहॉल आहे. जो 16 व्या शतकात निर्मित लाकडाने तयार एक घर आहे. या घरात मागील 500 वर्षांचा इतिहास सामावलेला आहे. यात एक बुकशॉपसोबत गार्डन आणि टी रुम देखील आहे.

सुंदर अनोखे घर

याचबरोबर येथे चर्च ऑफ सेंट पीटर अँड सेंट पॉल देखील असून ते गोथिक वास्तुकलेचे उदाहरण आहे. हे चर्च सदैव लोकांसाठी खुले असते. परंतु लोकांमध्ये येथील नर्सरी गीत देयर वॉजच्या क्रूक्ड मॅनने प्रेरित नारिंगी रंगाचे घराचे आकर्षण असते. हे घर कधीही कोसळेल असे वाटत असते. परंतु हे प्रत्यक्षात पूर्णपणे सुरक्षित घर असल्याचे त्याच्या मालकांचे सांगणे आहे. परंतु या घराला सोशल मीडियावर मोठी पसंती मिळाली आहे.

हॅरी पॉटर चित्रपटात झळकले

हे गाव प्रसिद्ध हॅरी पॉटर चित्रपट ‘द डेथली हॉलोज पार्ट 1’मध्ये दिसून आले आहे. तर लेवनहॅमचा गिल्डॉल चित्रपटात हॅरी पॉटरच्या आईवडिलांचे घर म्हणून दर्शविण्यात आले आहे. या गावात बेकर, किराणा स्टोअरसह अनेक दुकाने दिसून येतील. परंतु याच्बारोबर डिझाइनर घरगुती सामग्री, कपडे, उत्तम भेटवस्तू आणि स्मरणीय ठरणारी सामग्री खरेदी करण्याची संधी मिळते. येथे पब्ज, टी रुम, कॅफे असल्याने पर्यटकांना येथील अनोख्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येतो.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article