जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांला मिळणार 2029 पर्यंत घरकुल
सांगली :
2029 पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला घरकुल देण्यात येणार आहे. या वर्षासाठी 6534 बांधण्यासाठी नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. शासनाच्या या योजनेमुळे गोरगरीबांच्या स्वत:च्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबा†वली जाते. ग्रामीण भागातील दा†रद्रय रेषेखालील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. 2011 च्या आर्थिक सामा†जक व जात सर्वेक्षणाची मा†हतीच्या आधारे 2015-16 पासून पुढील वर्षांसाठी लाभार्थ्यांची ा†नवड केली जाणार असून घरकुलांसाठी लाभार्थ्यांना एक लाख 48 हजार ऊपयांचे अर्थसहाय ा†दले जाते.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ा†जह्यासाठी यावर्षी शासनाने 6534 घरकुलांचे उद्दीष्ट ा†दले आहे. यामध्ये सर्वसधारण गटासाठी 3347 तर अनुसा†चत जाती लाभार्थीसाठी 3187 घरकुलांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील 334, जत एक हजार 490, कडेगाव 358, कवठेमहांकाळ 397, खानापूर 427, ा†मरज एक हजार 135, पलूस 429, ा†शराळा 550, तासगाव 534 आा†ण वाळवा तालुक्याला 880 घरकुलांचे उा†द्दष्ट देण्यात आले आहे.
2029 पर्यंत सर्व पात्र कुटुंबाना घरकुलाचे उद्दिष्ट मागील चार वर्षापासून ा†जह्याला उा†द्दष्ट ा†मळाले नव्हते. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे योजना रखडली होती. कोरोनानंतरही केंद्र सरकारकडून यादी मंजुरीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. 2021 पासून प्रधानमंत्री आवास योजनेची यादी मंजूर झालेली नाही. ा†जह्यातील 59265 लाभार्थींची यादी केंद्र सरकारकडे प्रलां†बत आहे. केंद्रात सलग ा†तसऱ्यांदा भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर 2029 पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर देण्याची पुन्हा घोषणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. पहिल्या वर्षी 6534 घरकुलांचे उा†द्दष्ट मिळाले असून यामुळे ग्रामीण भागातील गरीब आा†ण सर्वसामान्य लाभार्थींचे घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.