For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

या वृक्षाची सावलीही विषारी !

06:30 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
या वृक्षाची सावलीही विषारी
Advertisement

पृथ्वीवररील प्राणीसृष्टी पूर्णत: वृक्ष आणि वनस्पतींवर अवलंबून आहे. कारण प्राणीसृष्टीला अन्न आणि प्राणवायू पुरविण्याचे कार्य वृक्ष आणि वनस्पती करीत असतात. पूर्ण मांसाहारी प्राण्यांनाही अप्रत्यक्षरित्या वनस्पतीच अन्नपुरवठा करीत असतात. कारण, गवत खाऊन जगणारे शाकाहारी प्राणीच या मांसाहारी प्राण्यांचे भक्ष्य असतात. तथापि, पृथ्वीवर असे काही वृक्ष किंवा वनस्पती आहेत, की ज्यांची सावलीही जिवंत प्राण्यांसाठी आणि मानवासाठी धोकादायक ठरु शकते. ही झाले अत्यंत विषारी असतात. अशा विषारी झाडांमध्ये ‘मंचीनील ट्री’ नामक झाड सर्वात विषारी मानले जाते. या झाडाचे फळ दिसायला छोट्या सफरचंदासमान असते. ते फळही अतिविषारी आहे. यामुळेच या झाडाला ‘डेथ अॅपल‘ असे सार्थ नाव आहे.

Advertisement

हे झाड प्रामुख्याने कॅरिबियन द्वीपे, अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांताचा तटीय भाग, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग या भूप्रदेशात आढळते. त्याच्या अतिविषारी गुणधर्मामुळे हे झाड पर्यटकांसाठी सावधानीचा, तर संशोधकांसाठी आकर्षणाचा विषय कित्येक वर्षांपासून ठरले आहे. या झाडाचे सर्वात मेठे वैशिष्ट्या असे की, त्याचा प्रत्येक भाग विषारी आहे. पाने, खोड, फुले, फळे, पानांमधून आणि खोडांमधून निघणारा दुधासारखा रस, फांद्या आदी सर्व भाग भयंकर विषारी असतात. पावसात कोणी या झाडाखाली पाऊस लागू नये म्हणून थांबला, आणि याच्या अंगावर या झाडावरुन ओघळलेले पाण्याचे थेंब पडले, तर त्याला विषबाधा होऊ शकते, असे मानले जाते. त्यामुळे संशोधक पावसातही या झाडाखाली थांबू नका, असा सल्ला पर्यटकांना देतात. याची फळे खायची तर नसतातच. पण त्यांना स्पर्शही करायचा नसतो. तशा स्पष्ट सूचना पर्यटकांना दिल्या जातात. स्थानिक नागरीकांच्या म्हणण्यानुसार या झाडाची सावलीही विषारी असते. तथापि, हे म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. तरीही कोणीही या झाडाच्या जवळ जाणेही टाळतो. या झाडाची फळे पाहताक्षणीच खावीत अशी वाटणारी अत्यंत रसरशीत आणि हरित रंगाची असतात. पण त्यांचा चावा जरी घेतला, तरी मृत्यू ओढविण्याची शक्यता असते. त्यामुळे फळांपासूनही पर्यटक स्वत:ला जपतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.