डॉक्टरही आश्चर्यचकित
अनेक लोकांना थक्क करणाऱ्या विचित्र सवयी असतात, ही बाब सर्वज्ञात आहे. जपानमध्ये एक असा प्रकार घडला आहे, की जो याची प्रचीती देतो. या देशातील एका व्यक्तीचा पोटदुखीच्या विकारामुळे मृत्यू झाला. मृत्यू नैसर्गिक वाटत नव्हता. त्यामुळे त्याच्या मृतदेशाची उत्तरीय चिकित्सा करण्यात आली. त्याच्या पोटात आणि आतड्यांमध्ये अशा वस्तू सापडल्या, की ज्यामुळे डॉक्टरांवरही आवाक् होण्याची वेळ आली. हा प्रकार सध्या या देशात मोठ्या चर्चेचा विषय बनल्याचे दिसून येते.
या व्यक्तीचे नाव काही कारणामुळे गुप्त ठेवण्यात आले आहे. तो एक 60 वर्षांचा प्रौढ गृहस्थ होता. त्याला असह्या पोटदुखीमुळे त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात आणले होते,. दोन दिवस प्रयत्न करुनही त्याच्या पोटदुखीचे निदान होऊ शकले नाही. त्यामुळे उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याची उत्तरीय शल्यचिकित्सा (पोस्ट मार्टेम) करण्यात आले. त्याच्या आतड्यात एक ‘आयलायनर’ नावाचे साधन सापडले. अनेक दिवसांपासून ते तेथे अडकले असावे. कारण त्या साधनाला लागून एक गाठही विकसीत झाली होती. यामुळे त्याच्या मूत्रपिंडांवर दाब येऊन त्यांनी काम करणे बंद केले होते. परिणामी, त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पोटात अडकलेला आयलायनर अॅल्य्मिनियमचा असून तो जवळपास 8 मिलीमीटर रुंद होता. तो काढण्यात आला. मात्र, तो त्याच्या पोटात शिरला कसा, याचे डॉक्टरांनाही आश्चर्य वाटत होते. या प्रकाराचे अन्वेषण करण्यात आले, तेव्हा या व्यक्तीच्या काही विचित्र आणि विकृत सवयींचा उलगडा झाला. त्याला महिलांची वस्त्रे आणि आतली वस्त्रे परिधान करण्याचा नाद होता. तसेच, त्याला काही लैंगिक साधनांचाही (व्हायब्रेटर्स) उपयोग करण्याची सवय जडली होती. अशाच विकृत प्रयत्नांमध्ये तो आयलायनर त्याच्या आतड्यांमध्ये शिरला आणि तो त्याला काढता न आल्याने त्याला प्राण गमवावा लागला आहे.
सध्या या घटनेची चर्चा केली जात आहे. माणसाने आपल्या सवयींवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. विशेषत: काही जगावेगळ्या आणि विकृत सवयी असतील, तर त्यांच्यावर वेळीच वैद्यकीय उपचार करुन घेतले पाहिजेत आणि त्या घालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा त्या सवयी कोणत्या थराला जातील, तसेच त्यांच्यातून कोणता अनर्थ घडून कसा सर्वनाश ओढवेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे या उदाहरणावरुन धडा घ्यावा, असे प्रतिपादन डॉक्टरांनी केले आहे.