For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अजगरालाही होतो कर्करोग

06:39 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
अजगरालाही होतो कर्करोग
Advertisement

कर्करोग किंवा कॅन्सर हा प्रामुख्याने माणसालाच होऊ शकतो, अशी कित्येकांची समजूत आहे. सर्वसाधारणपणे इतर प्राणी प्रजाती या विकारापासून दूर असतात, असेही समजले जाते. तथापि, अजगरासारख्या प्राण्यालाही कर्करोग होऊ शकतो. तसेच, माणसाचा कर्करोग ज्याप्रमाणे ‘केमोथेरपी’ने बरा होऊ शकतो, तसा अजगाराचाही कर्करोग केमोथेरपीने घालविता येऊ शकतो, असे दिसून आले आहे.

Advertisement

ब्रिटनमधील चेस्टर प्राणीसंग्रहालयात एका 23 वर्षे वयाच्या मादी अजगराला कर्करोगाची बाधा झाल्याचे, तेथील पशुवैद्यांना समजून आले. अजगराची शस्त्रक्रिया करुन कर्करोगग्रस्त भाग काढून टाकला गेला. तथापि, काही काळानंतर पुन्हा गाठ निर्माण झाल्याने केमोथेरपीच्या पर्यायावर विचार करण्यात आला. तथापि, आजवर जगात अजगरावर केमोथेरपी करण्यात आल्याचे एकही उदाहरण नव्हते. त्यामुळे या प्राणीसंग्रहालयाच्या पशुवैद्यांसमोर आव्हान निर्माण झाले. ही अजगर मादी दुर्मिळ प्रजातीची असल्याने तिचा जीव वाचविणे आवश्यक होते. या अजगर मादीच्या जबड्यात कर्करोगाची गाठ निर्माण झाली होती आणि ती दिवसेंदिवस मोठी होताना दिसत होती. अजगराने खाणे कमी केले होते आणि ती सुस्त पडून रहात होती. अखेर तिचा जीव वाचविण्यासाठी केमोथेरपी करण्याचा निर्णय झाला. प्रथम या अजगरावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येऊन गाठीचा बराचसा भाग पुन्हा काढून टाकण्यात आला. नंतर दुखणे पुन्हा उद्भवू नये, म्हणून इलेक्ट्रोकेमोथेरपी करण्यात आली. अजगराची लांबी 15 फूट असल्याने दोन शस्त्रक्रिया टेबले जोडून दिला त्यांच्यावर ठेवण्यात आले. उपचार 90 मिनीटे चालले. अजगरावर केमोथेरपी करण्याचा जगातील हा प्रथम प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. कारण अजगराची प्रकृती सुधारली असून तिने पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास प्रारंभ केला आहे. तिच्या हालचालीही आता पूर्ववत होत आहे, अशी माहिती देण्यात आली.

Advertisement
Advertisement
Tags :

.